India vs Zimbabwe 1st ODI Live : भारताचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. लोकेशने बऱ्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन केले, तर दीपक चहरही ( Deepak Chahar) जवळपास ६ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय. त्याने त्याच्या स्विंग गोलंदाजीने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना हैराण करून सोडले. सुरुवातीच्या सहा षटकांत धावगतीवर चाप बसवल्यानंतर चहरने धक्के देण्यास सुरुवात केले. २१ चेंडूंत झिम्बाब्वेच्या चार फलंदाजांना माघारी पाठवून भारताला चांगली सुरुवात करून दिली.
भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.