Join us

IND vs WI ...अन् गिलची 'फिफ्टी' ठरली ऐतिहासिक; गावसकरांच्या ४७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

जे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गजांना जमलं नाही ते शुबमन गिलनं करून दाखवलंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:43 IST

Open in App

IND vs WI Shubman Gill Equaled Sunil Gavaskar Record : भारतीय कसोटी संघाचा युवा अन् नवा कर्णधार शुबमन गिल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या अहमदाबाद कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात गिलनं १०० चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीसह त्याने लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या ४७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला गवसणी घातली. भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना जे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गजांना जमलं नाही ते शुबमन गिलनं करून दाखवलंय. इथं एक नजर टाकुयात त्याने सेट केलेल्या खास विक्रमावर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गावसकर यांच्या नंतर अशी कामगिरी करणारा दुसरा कर्णधार

शुबमन गिलनं कॅप्टन्सीच्या पदार्पणात इंग्लंड दौरा गाजवल्याचे पाहायला मिळाले. आता घरच्या मैदानात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो दुसरा कर्णधार ठरलाय. याआधी १९७८ मध्ये सुनील गासकर यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात २०५ धावांची खेळी केली होती. कमालीचा योगायोग हा की गावसकरांनीही वेस्ट इंडिज विरुद्धच ही कामगिरी नोंदवली होती. २१ व्या शतकात घरच्या मैदानावर पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक झळकवणारा तो पहिला कर्णधार ठरलाय. 

IND vs WI : लकी मैदानात गिलनं फिफ्टी ठोकली; पण त्यानंतर लगेच उलटा फटका मारण्याचा डाव अंगलट आला!

'फिफ्टी' साजरी करताना ३०० चा खास आकडाही गाठला

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शुबमन गिलनं लोकेश राहुलच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची उपयुक्त भागीदारी रचली. त्याने १०० चेंडूत केलेल्या ५० धावांच्या संयमी खेळीत ५ चौकार मारले. यासह त्याने कसोटीत ३०० चौकार मारण्याचा पल्लाही गाठला आहे.  

केएल राहुलंच शतक

शुबमन गिल बरोबर ५० धावा करून बाद झाल्यावर लोकेश राहुलच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली.  पण तोही १०० धावा करून तंबूत परतला. या खेळीत त्याने १९७ चेंडूचा सामना करताना १२ चौकार मारले. भारतीय मैदानात २०१६ नंतर लोकेश राहुलच्या भात्यातून आलेली ही दुसरी शतकी खेळी ठरली. याआधी लोकेश राहुलनं ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध घरच्या मैदानात अनऑफिशियल टेस्टमध्ये बेस्ट अन् मॅच विनिंग सेंच्युरी ठोकली होती. हाच फॉर्म कायम ठेवत त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणून सोडले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs WI: Gill equals Gavaskar's 47-year-old record with fifty.

Web Summary : Shubman Gill matched Sunil Gavaskar's record, scoring a fifty as captain against West Indies. He's the second captain after Gavaskar to achieve this. KL Rahul also scored a century, strengthening India's position.
टॅग्स :शुभमन गिलभारत विरुद्ध वेस्ट इंडिजजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धालोकेश राहुलसुनील गावसकर