Join us

राहुल द्रविड कन्फ्युज! ऋतुराज गायकवाड-यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हेच कळेना

IND vs WI Series 1st Test : वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात चेतेश्वर पुजाराला बाकावर बसवले गेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 11:06 IST

Open in App

IND vs WI Series 1st Test : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( २०२३-२५) टप्प्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून भारताचा WTC मधील प्रवास सुरू होणार आहे. मागच्या दोन्ही पर्वात उप विजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर भारतीय संघ आता नव्या जोमाने मैदानावर उतरणार आहे. भविष्याचा विचार करून भारतीय संघ युवा खेळाडूंना संधी देणार आहे, पण याच निर्णयाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याची गोची झाली आहे. 

वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात चेतेश्वर पुजाराला बाकावर बसवले गेले आहे. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार या युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. पण, यापैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला खेळवायचे हा पेच निर्माण झाला आहे. अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या जागी म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज की यशस्वी अशी चुरस रंगलेली आहे. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. 

१२ जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत ऋतुराज व यशस्वी हे दोघंही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. रोहित शर्मा व शुबमन गिल ही जोडी सलामीला कायम राहिल. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी द्रविडला ऋतुराज किंवा यशस्वी यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धांसोबत आयपीएल २०२३ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. हे दोन्ही फलंदाज सलामीला खेळतात, परंतु टीम इंडियाच्या गरजेनुसार त्यांना तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागेल.   

अशी असेल पहिल्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनरोहित शर्माशुबमन गिलयशस्वी जैस्वाल/ऋतुराज गायकवाडविराट कोहलीअजिंक्य रहाणे इशान किशन/केएस भरत ( यष्टीरक्षक) रवींद्र जडेजाआर अश्विनशार्दूल ठाकूरमुकेश कुमार/जयदेव उनाडकटमोहम्मद सिराज 

कसोटी सामन्याची वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून पहिले सत्र - ७.३० ते ९.३० दुसरे सत्र - १०.१० ते १२.१० तिसरे सत्र- १२.३० ते २.३० 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयशस्वी जैस्वालऋतुराज गायकवाड
Open in App