Mohammed Siraj Record : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजनं मोठा डाव साधला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भेदक मारा करत सिराजनं ११ षटकात ३४ धावा खर्च करुन ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कला धोबीपछाड दिलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
WTC च्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सिराज अव्वलस्थानी पोहचलाय. याआधी ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क नंबर होता. त्याला मागे टाकत सिराज आता WTC २०२५ च्या हंगामातील टॉपर गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धसा सलामीवीर टॅगेनरीन चंद्रपॉलसह एलिक एथानाजे, ब्रेंडन किंग आणि रॉस्टन चेज यांच्या रुपात सिराजनं पहिल्या डावात चार विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले.
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
२०२५ मध्ये ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- मोहम्मद सिराज - ३०
- मिचेल स्टार्क - २९
- नॅथन लायन - २४
- शमार जोसेफ - २२
- जोश टंग - २१
यावर्षात या गोलंदाजाने घेतल्या सिराजपेक्षा अधिक विकेट्स
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सिराज नंबर वन असला तरी एकंदरीत कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदांच्या यादी तो दुसऱ्या स्थानावर दिसतो. यावर्षात कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम हा ब्लेसिंग मुजारबानी याच्या नावे आहे. त्याने आतापर्यंत ३६ विकेट्स घेतल्या आहेत. पण झिम्ब्वाव्बेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाही. त्यामुळेच WTC मध्ये सर्वात्तम कामगिरीसह वर्ष गाजवणाऱ्या गोलंदाजांमध्ये सिराज अव्वल ठरतो.