IND vs WI, Test John Campbell’s Record-Breaking Century दिल्लीच्या अरुण जेटली स्टडियमवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात कॅरेबियन सलामीवीर जॉन कॅम्पबेल याने विक्रमी शतक झळकावले. चौथ्या दिवसाच्या खेळात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार मारून त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. कॅम्पबेलनेही कसोटी कारकिर्दीतील २५ सामन्यांतील ५० डावांत पहिल्या शतकाला गवसणी घालताना खास विक्रमांना गवसणी घातीली. कसोटीत षटकारासह सेंच्युरीचा आकडा गाठणारा को पाचवा फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर मागील २३ वर्षांत एकाही कॅरेबियन खेळाडूला जमलं नाही ते या पठ्ठयानं करून दाखवलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शतकी दुष्काल संपवताना साधला मोठा डाव
कॅम्पबेलच्या खेळीसह वेस्ट इंडिज संघाचा ७ वर्षांचा शतकी दुष्काळही संपला. विद्यमान कर्णधार रोस्टन चेस याने २०१८ मध्ये भारतीय संघाविरुद्ध हैदराबाद कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर आता सात वर्षांनी जॉन कॅम्पबेल याच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली. याशिवाय सलामीवीराच्या रुपात त्याने यापेक्षा जबरदस्त विक्रम आपल्या नावे केला आहे.
PAK vs SA : DRS ड्रामा! मग LIVE मॅचमध्ये रमीझ राजानं काढली बाबर आझमची लाज; व्हिडिओ व्हायरल
२३ वर्षांनी असं घडलं
जॉन कॅम्पबेल हा मागील २३ वर्षांत भारतीय मैदानात कसोटी शतक झळकवणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. याआधी २००२ मध्ये वेव्हेल हिंड्स याने कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात १०० धावांची खेळी केली होती. त्यानंतर एकाही कॅरेबियन सलामीवीरला भारतीय मैदानात टीम इंडियाविरुद्ध खेळताना शतकी खेळी करता आली नव्हती.
लारालाही जमलं नाही ते या पठ्ठानं करून दाखवलं
१९९० नंतर वेस्ट इंडिज संघाकडून भारत दौऱ्यावर शतकी खेळी करणारा तो वेव्हेल हिंड्स याच्यानंतर दुसरा सलामीवीर ठरला. १९९ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने त्याने ११५ धावांची खेळी केली. ही कॅरेबियन सलामीवीराने भारतीय मैदानात केलेली सर्वोच्च खेळीही ठरली. भारत दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध खेळताना महान क्रिकेटपटू ब्रायन लारानंही वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात केली. पण त्यालाही शतकी खेळी करता आलेली नाही.
१९९० नंतर कसोटीत भारतीय मैदानात सर्वाधिक धावा करणारे वेस्ट इंडिज सलामीवीर
जॉन कॅम्पबेल ११५ धावा , दिल्ली (२०२५)
वेव्हेल हिंड्स १०० धावा, कोलकाता (२०२२)
ब्रायन लारा ९१ धावा, मोहाली (१९९४)