Join us

IND vs WI : 'फायनल' सामन्यात भारताने टॉस जिंकला; पांड्याकडून भारतीय गोलंदाजांचे 'हार्दिक' अभिनंदन

IND vs WI 5th T20 Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 19:38 IST

Open in App

IND vs WI 5th T20 Live Updates in marathi : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज होत आहे. फ्लोरिडातील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर हा सामना होत असून यातील विजयी संघ मालिका खिशात घालेल. मालिकेतील पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले तर सलग दोन सामने जिंकून भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. आजच्या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, नाणेफेकीनंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने भारतीय गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक केले. शनिवारी इतर गोलंदाज अयशस्वी होत असताना अर्शदीप सिंगने चमकदार कामगिरी केली. याबद्दल बोलताना हार्दिकने म्हटले, "होय, नक्कीच अर्शदीप सिंगने चांगली कामगिरी केली. त्याने चौथ्या सामन्यात तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय इतर गोलंदाजांनी देखील चांगले आव्हान दिले."

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण २९ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने १९ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने केवळ ९ सामने जिंकले आहेत.  तर, एक सामना अनिर्णित संपला होता.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ -रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ.

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजहार्दिक पांड्याअर्शदीप सिंगभारतीय क्रिकेट संघ
Open in App