India vs West Indies, 3rd T20I Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणखी एक क्लिन स्वीप देण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व शेवटचा ट्वेंटी-२० सामना आज ईडन गार्डनवर होणार आहे. पण, आता हा सामना होणार की नाही, यावरच संभ्रम निर्माण झाले होते. बीसीसीआयने संपूर्ण मैदान कव्हर केल्याचा फोटो पोस्ट केल्याने पाऊस पडत असल्याचा अंदाज बांधला गेला होता, पण कव्हर हटवण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी माजी कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी बायो बबल सोडून १० दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात तीन बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते.
रोहित शर्मा व
ऋतुराज गायकवाड आजच्या सामन्यात सलामीला येण्याची शक्यता होती. ऋतुराजला मागील दोन सामन्यांत संधी मिळाली नव्हती. त्याच्या जागी
इशान किशन सलामीला खेळला, परंतु आजच्या सामन्यात किशन मधल्या फळीत खेळण्याची शक्यता होती. विराटच्या जागी संघात श्रेयस अय्यरचे पुनरागमन होण्याचा अंदाज होता.
वेस्ट इंडिजच्या संघात आजच्या सामन्यात चार बदल करण्यात आले आहेत. IPL 2022 Mega Auction मध्ये लखनौ सुपर जायंट्सने १० कोटींची बोली लावून ताफ्यात दाखल करून घेतलेल्या आवेश खान ( Avesh Khan) याने आज भारतीय संघाकडून पदार्पण केले. पण, रोहितने सर्व अंदाज चुकवून संघात चार बदल केले. आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड व इशान किशन यांना सलामीला खेळण्याची संधी दिली.
भारताचा संघ - ऋतुराज गायकवाड, इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, हर्षल पटेल, आवेश खान, रवी बिश्नोई.