Shubman Gill Wants Rohit Sharma Virat Kohli For ODI World Cup 2027 : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. १० आक्टोबरपासून रंगणाऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कसोटीत कॅरेबियन संघाला २-० मात देण्यासाठी मैदानात उतरण्याआधी शुबमन गिलनं भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. हे दोन्ही दिग्गज ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आगरकरांनी संभ्रमात टाकले, पण गिलनं अगदी स्पष्ट मत मांडलं
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देत आठ महिन्यात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्यावरही रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढून टाकण्यात आले. त्याच्या जागी शुबमन गिल टीम इंडियाचा नवा कर्णधार झाला आहे. या बदलानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार का? हा मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय. बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख अजित आकरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघ निवडीनंतर रोहित-विराटच्या आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासंदर्भातील प्रश्नावर कोड्यात टाकणारे उत्तर दिले . दोन्ही दिग्गजांनी भविष्यातील योजना स्पष्ट केलेली नाही, असे ते म्हणाले. पण शुबमन गिलनं मात्र या दोघांसदर्भात आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
रोहित शर्मा आणि विराट कोहलीसंदर्भात काय म्हणाला शुबमन गिल?
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत यश मिळवण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे योगदान संघासाठी उपयुक्त ठरेल, असे मत शुबमन गिलनं मांडलं आहे, तो म्हणाला की. दोघांकडे अनुभव आणि कौशल्य आहे. ही गोष्ट सहजा सहजी मिळत नाही. अनुभव आणि क्षमतेच्या जोरावर ही जोडी फक्त टीम इंडियातीलच नव्हे तर जगात भारी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत ते भारतीय संघातील यशाची गुरुकिल्ली ठरतील, असे सकारात्मक मत मांडत या दोघांनी खेळावे, अशी इच्छा शुबमन गिलनं व्यक्त केली आहे. जोडीबद्दल नकारात्मक चर्चा रंगत असताना त्याचे सकारात्मक वक्तव्य क्रिकेट चाहत्यांनाही दिलासा देणारे आहे.
Web Summary : Shubman Gill supports Rohit Sharma and Virat Kohli's inclusion in the 2027 World Cup squad. He highlighted their experience and skills, deeming them crucial for India's success in the tournament, amidst ongoing speculation about their future.
Web Summary : शुभमन गिल ने रोहित शर्मा और विराट कोहली को 2027 विश्व कप टीम में शामिल करने का समर्थन किया। उन्होंने उनके अनुभव और कौशल पर प्रकाश डाला, उन्हें टूर्नामेंट में भारत की सफलता के लिए महत्वपूर्ण माना।