IND vs WI 2nd Test : विराट कोहलीसाठी हा सामना आहे खास; १५० वर्षांच्या इतिहासात १० खेळाडूंना जमलाय हा पराक्रम

भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरी कसोटी जिंकून शंभरावी कसोटी ऐतिहासिक बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 07:36 PM2023-07-20T19:36:57+5:302023-07-20T19:39:53+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test Live Update : Virat Kohli becomes the 10th player to play 500 international matches. | IND vs WI 2nd Test : विराट कोहलीसाठी हा सामना आहे खास; १५० वर्षांच्या इतिहासात १० खेळाडूंना जमलाय हा पराक्रम

IND vs WI 2nd Test : विराट कोहलीसाठी हा सामना आहे खास; १५० वर्षांच्या इतिहासात १० खेळाडूंना जमलाय हा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs West Indies 2nd Test Live : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होतोय... IND vs WI यांच्यामधील हा १००वा कसोटी सामना आहे. भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरी कसोटी जिंकून शंभरावी कसोटी ऐतिहासिक बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. तेच यजमान विंडीज या कसोटीत पुनरागमनासाठी प्रयत्नशील असणार आहेत. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना हा विराट कोहलीचा ( Virat Kohli) ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि त्याच्यासह केवळ १० खेळाडूंना हा टप्पा ओलांडता आलाय.

 

४९९ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
विराट कोहली - २५४६१
रिकी पाँटिंग - २४९९१
सचिन तेंडुलकर - २४८३९  

विराट कोहलीचा प्रवास
७५ शतकं 
१३१ अर्धशतकं
२५४६१ धावा
२५२२ चौकार
२७९ षटकार
५३.४८ सरासरी 
३३ वेळा शून्यावर बाद
६३ मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार
२० मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कार 

भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीने हा पल्ला गाठलाय. 
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने 
सचिन तेंडुलकर - ६६४
माहेला जयवर्धने - ६५२
कुमार संगकारा - ५९४
सनथ जयसुर्या - ५८६
रिकी पाँटिंग - ५६०
महेंद्रसिंग धोनी - ५३८
शाहिद आफ्रिदी - ५२४
जॅक कॅलिस - ५१९
राहुल द्रविड - ५०९
विराट कोहली - ५००

Web Title: IND vs WI 2nd Test Live Update : Virat Kohli becomes the 10th player to play 500 international matches.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.