Jasprit Bumrah Record With 50th Test Match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियवर खेळवण्यात येत आहे. हा सामना जसप्रीत बुमराहसाठी खास आहे. विश्रांती न घेता मैदानात उतरताच त्याने या सामन्यात खास विक्रम आपल्या नावे केला. तो ५० वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५० सामने खेळणारा तो एकमेव भारतीय जलदगती गोलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वेळ घेतला, पण परफेक्ट यॉर्करसह साधला पहिल्या विकेटचा डाव
भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५१८ धावा करत दुसऱ्या दिवसाच्या खेळातच डाव घोषित केला. वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या डावाची सुरुवात केल्यावर दुसऱ्या दिवसाअखेर १४० धावांवर ४ विकेट्स गमावल्या. पण यात जसप्रीत बुमराहाला काही विकेट मिळाली नाही. तिसऱ्या दिवसाच्या खेळात कुलदीपनं आपल्या फिरकीची जादू दाखवल्यावर जसप्रीत बुमराह पिक्चरमध्ये आल. या सामन्यातील ११ व्या षटकात जसप्रीत बुमराहनं पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. खारी पिएरला त्याने एका अप्रतिम यॉर्करवर तंबूचा रस्ता दाखवला.
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
कसोटीत १५ वेळा साधलाय पाच विकेट्सचा डाव
जसप्रीत बुमराहनं २०१८ मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने ५० कसोटी सामन्यात २२३ विकेट्स घेतल्या आहेत. १५ वेळा पाच विकेट्सचा डाव साधताना २७ धावा खर्च करून ६ विकेट्स ही त्या कसोटीतील एका डावातील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. ८९ वनडेत बुमराहच्या खात्यात १४९ विकेट्सची नोंद असून टी-२० मध्ये त्याने ७५ सामन्यात ९६ विकेट्स घेतल्या आहेत.
बुमहारशिवाय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५० पेक्षा अधिक सामने खेळणारे भारतीय
- महेंद्रसिंह धोनी
- विराट कोहली
- रवींद्र जडेजा
- रविचंद्रन अश्विन
- रोहित शर्मा
- के.एल. राहुल