Gautam Gambhir To Host Dinner Party For Shubman Gill And All Indian Cricket Team: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यग्र आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिला कसोटी सामना तिसऱ्या दिवशी जिंकत टीम इंडियाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता १० ऑक्टोबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने संघातील खेळाडूंसाठी आपल्या घरी पार्टीचा बेत आखला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् कुठं नियोजित आहे ही पार्टी?
एएनआयनं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, गौतम गंभीरनं ८ ऑक्टोबरला आपल्या अलिशान घरी टीम इंडियातील खेळाडूंसाठी डिनर पार्टीचा प्लॅन करत आहे. अलिशान घराभोवती असणाऱ्या गार्डनमध्ये खेळाडूंना एकत्र जमावण्याचा त्याचा विचार आहे. पण जर पाऊस आला तर हा बेत रद्द करण्यात येईल, असा उल्लेखही वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
कोण कोणते खेळाडू सहभागी होणार?
आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिके दरम्यान ही पार्टी आयोजित करण्याचा बेत असल्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील कसोटी संघातील सर्व सदस्य आणि स्टाफ मेंबर या पार्टीत सहभागी झाल्याचे दिसून शकते. याशिवाय आणखी कोण वेगळा चेहरा दिसणार का? त्यासंदर्भातील चित्र पार्टीनंतरच स्पष्ट होईल.
पार्टीत काय शिजणार?
कमालीचा योगायोग हा की, वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात मोठी खांदेपालट झाल्याचे पाहायला मिळाले. कसोटी पाठोपाठ आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही शुबमन गिलकडे नेतृत्व देण्यात आले आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठीचा गेम प्लॅनही या पार्टीत आखला जावू शकतो. पार्टीच निमित्त फक्त दिल्ली कसोटी आहे की, त्यामागे आणखी काही वेगळी कारणं आहेत ते पार्टी देणाऱ्याला आणि पार्टीत सहभागी होणाऱ्याला अधिक समजेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाच्या वनडे संघात झालेली खांदेपालट होण्यामागे गंभीरचा हात असल्याची चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या पार्टीचा संबंध त्या गोष्टीशीही जोडला जाऊ शकतो.