Join us

IND vs WI 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा Golden Duck वर माघारी परतला; अर्शदीप सिंग ओपनिंगला आला?, भारताला दुसरा धक्का बसला

India vs West Indies 2nd T20I Live Updates : ३ तास विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांना निराश केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 23:33 IST

Open in App

India vs West Indies 2nd T20I Live Updates : ३ तास विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांना निराश केले... रोहित शर्मा ( Rohit Sharma) पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने चाहते हिरमुसले.. ओबेड मॅकॉयने पहिल्या चेंडूवर अप्रतिम बाऊन्सर फेकून रोहितला  झेल देण्यास भाग पाडले. अकिल होसैनने हवेत झेपावत अप्रतिम झेल घेतला. दरम्यान, रोहित शर्मासोबत सलामीला गोलंदाज अर्शदीप सिंग आल्याचे दिसले, कारण रोहितबरोबर आलेल्या फलंदाजाच्या जर्सीवर Arshdeep असे लिहिले होते. पण, सूर्यकुमार यादव चुकीची जर्सी घालून मैदानावर आल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमारने सुरेख षटकार खेचला, परंतु मॅकॉयने त्यालाही चकवले आणि यष्टिरक्षकाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. भारताला १७ धावांवर दोन धक्के बसले.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना तीन तास विलंबाने सुरू झाला. त्रिनबागो येथे  सेंट किट्स येथे खेळाडूंचे सामानच पोहोचले नसल्याने सुरुवातीला हा सामना १० वाजता सुरू होईल असे सांगितले गेले. पण, तरीही विलंब झालाच आणि अखेर १०.३०वाजता नाणेफेक झाली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल पाहायला मिळाला. भारतीय संघात फिरकीपटू रवी बिश्नोईच्या जागी आवेश खानला आज खेळवण्यात आले आहे. रोहित शर्मा व रिषभ पंत सलामीला येणार असून श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा अशी बॅटींग लाईनअप आहे. भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, आवेश खान व अर्षदीप सिंग असा उर्वरित संघ आहे. हर्षल पटेलला दुखापत झाल्याने तो आजच्या व तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादव
Open in App