India vs West Indies 2nd T20I Live Update : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि दुसऱ्याच षटकात विकेट घेत विंडीजने मोठा धक्का दिला. इशान किशन २ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे. पण, या डावातील चौथ्या षटकात गमतीदार किस्सा घडला. चेंडू अडवण्यासाठी रोहित स्टम्पसमोर आडवा उभा राहिला आणि हे पाहून प्रशिक्षक राहुल द्रविडलाही हसू आवरले नाही.
वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) आज १०० वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे आणि विंडीज संघाने सामन्याआधी त्याचा सत्कार सोहळा पार पाडला. वेस्ट इंडिजने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विंडीजच्या संघात जेसन होल्डरचे पुनरागमन झाले आहे आणि फॅबियन एलनला बाकावर बसावे लागणार आहे. दुखापतीमुळे जेसन पहिल्या ट्वेंटी-२०त खेळला नव्हता. भारतीय संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही.
वेस्ट इंडिजकडून १०० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळण्याचा पहिला मान किरॉन पोलार्डने पटकावला...
कोणी सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने खेळले?
१२४ - शोएब मलिक
१२१ - रोहित शर्मा
११९ - मोहम्मद हाफिज
११५ - इयॉन मॉर्गन
११३ - महमुदुल्लाह
११२ - मार्टीन गुप्तील
११० - केव्हिन ओ'ब्रायन
१०२ - रॉस टेलर
१०० - किरॉन पोलार्ड
इशान किशन दुसऱ्याच षटकात माघारी परतला. शेल्डन कोट्रेलच्या चेंडूचा अंदाज घेण्यात तो चूकला अन् कायल मेयर्सने ( २) त्याचा सोपा झेल घेतला. शेल्डन कोट्रेलच्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहित मारलेला फटका चुकला अन् चेंडू जागच्या जागी हवेत उडाला. तो टप्पा खावून स्टम्प्सवर आदळतोय असे रोहितला वाटले, परंतु चेंडू नेमका कुठेच हेच त्याला माहित नव्हते. म्हणून त्यानं संपूर्ण स्टम्प्सना वेढा घातला.
पाहा व्हिडीओ..