Join us

IND vs WI, 2nd ODI  Live Updates : भारतीय संघावर ICCची कारवाई, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील चूक भोवली! 

India vs West Indies, 2nd ODI  Live Updates : वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात भारताला कडवी टक्कर दिली. नशीब बाजूने होते म्हणून भारताने पहिला सामना ३ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 20:06 IST

Open in App

India vs West Indies, 2nd ODI  Live Updates : वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात भारताला कडवी टक्कर दिली. नशीब बाजूने होते म्हणून भारताने पहिला सामना ३ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळली. त्यामुळे दुसऱ्या वन डेत  संजू सॅमसन, दीपक हुडा,  सूर्यकुमार यादव यांच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून चूक झाल्याचे समोर आले आहे आणि ICC ने कारवाईचा बडगा उगारला आहे. 

पहिल्या वन डे सामन्यात भारताच्या ३०८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजने ३०५ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात भारताने षटकांची मर्यादा संथ ठेवली आणि त्यामुळे आयसीसीने त्यांच्या मॅच फीमधील २० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली आहे. कर्णधार शिखर धवनने ही चूक मान्य केली आहे. भारतीय संघाने निर्धारीत वेळेत १ षटक कमी फेकले आणि त्यामुळे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी ही कारवाई केली.  

आयसीसीच्या नियमानुसार निर्धारित वेळेत जेवढी षटकं पूर्ण करण्यात संघ अपयशी ठरेल, त्यानुसार प्रती षटक २० टक्के दंड हा खेळाडू, सहाय्यक प्रशिक्षक यांना भरावा लागतो.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजआयसीसी
Open in App