Join us

IND vs WACA Practice Match : विराट कोहली, लोकेश राहुल आज दुसऱ्या सराव सामन्यात खेळणार? जाणून घ्या मॅच कुठे पाहता येणार 

IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने पर्थ येथे तळ ठोकला... भारतीय खेळाडूंसाठी येथे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 09:57 IST

Open in App

IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने पर्थ येथे तळ ठोकला... भारतीय खेळाडूंसाठी येथे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले. भारताने पहिल्या सराव सामन्यात विजय मिळवला, परंतु गोलंदाजांची कामगिरी हा पुन्हा चिंतेचा विषय ठरला. अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार यांनी चांगली कामगिरी केली, परंतु हर्षल पटेलच्या ४ षटकात ४९ धावा आल्या. पहिल्या सामन्यांत विराट कोहलीलोकेश राहुल हे खेळले नव्हते. पण, आज ही दोघं खेळणार आहेत. आर अश्विनचेही आजे खेळणे निश्चित मानले जात आहे.

पहिल्या सराव सामन्यातील भारतीयांची कामगिरी - रोहित शर्मा - ३ ( ४), रिषभ पंत - ९ ( १६), दीपक हुडा - २२ ( १४) , सूर्यकुमार यादव - ५२ ( ३५), हार्दिक पांड्या - २९ ( २०), दिनेश कार्तिक - १९* ( २३) , अक्षर पटेल - १० ( ५), हर्षल पटेल - ५ ( ४); भुवनेश्वर कुमार - ४-०-२६-२, अर्शदीप सिंग - ३-१-६-३, हर्षल पटेल - ४-०-४९-१, अक्षर पटेल - ३-०-२३-०, दीपक हुडा - २-०-२४-०, युजवेंद्र चहल - ४-०-१५-२. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे झाल्यास डार्सी शॉर्ट, कॅमरून बॅनक्रॉफ्ट, एश्टन टर्नर, झाय रिचर्डसन आणि एंड्य्रू टाय यांचा संघात समावेश आहे. या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि काही आयपीएलमध्येही खेळले आहेत. 

पहिल्या सराव सामन्यात  सूर्यकुमार यादव ( ५२) व हार्दिक पांड्या ( २९) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने ६ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली होती. भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंग यांनी पहिल्या चार षटकांत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला १२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. २१ वर्षीय सॅम फॅनिंगने ५९ धावांची केली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला ८ बाद १४५ धावा करता आल्या, भारताने अवघ्या १३ धावांनी हा सामना जिंकला.  

  • सामन्याची वेळ - १३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता हा सामना सुरू होणार आहे 
  • थेट प्रक्षेपण - वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या यूट्युब चॅनेलवर सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2विराट कोहलीलोकेश राहुलसूर्यकुमार अशोक यादव
Open in App