IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारत-श्रीलंका यांच्यातील सेमी फायनलची पहिली लढत दुबईतील आयसीसी अकादमीच्या ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. पावसानंतर आउटफिल्डवरील ओलाव्यामुळे वनडे सामन्याचे रुपांतर टी-२० मध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १३८ धावा करत भारतीय संघासमोर १३९ धावांचे आव्हान ठेवले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघ अडचणीत असताना श्रीलंकेच्या संघाच्या कॅप्टनसह हीनातीगलाची उपयुक्त खेळी
भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किशन कुमार याने डावातील तिसऱ्या षटकात श्रीलंकन सलामीवीर दुलनिथ सिगेरा याला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. दिपेश देवेंद्रन याने विरन चमुदिता याला १९ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. सलामीवीरांच्या फ्लॉप शोनंतर श्रीलंकन संघ अडचणीत सापडला होता. पण त्यानंतर श्रीलंकन कर्णधार विमन दिनसरा याने २९ चेंडूत केलेल्या ३२ धावांच्या खेळीसह चमिका हीनातीगला याने ३८ चेंडूत ४२ धावांची संघाला दिलासा देणारी खेळी केली. अखेरच्या षटकात सेथमिका सेनेविरत्न याने २२ चेंडूत ३० धावांच्या खेळीसह श्रीलंकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद १३८ धावांपर्यंत मजल मारली. युवा टीम इंडियाकडून कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय खिलान पटेल, दिपेश देवेंद्रन आणि किशन कुमार सिंग यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
टीम इंडियाचा कॅप्टन आयुष म्हात्रेसहवैभव सूर्यवंशीवर असतील नजरा
आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत भारतीय संघाने सर्वच्या सर्व ३ सामने जिंकून सेमी फायनल गाठली आहे. १४ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने या स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करून दाखवली आहे. धावांचा पाठलाग करताना त्याच्याकडून पुन्हा एकदा दमदार खेळीची अपेक्षा असेल. याशिवाय आयुष्य म्हात्रेवरही मोठी जबाबदारी असेल.