Join us

IND vs SL: भारताविरुद्धच्या T20 मालिकेआधी श्रीलंकेला मोठा धक्का; स्टार खेळाडूची माघार

Setback to Sri Lanka against Team India, IND vs SL: दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतलेल्या खेळाडूच्या जागी बदली क्रिकेटरची अद्याप घोषणा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 14:14 IST

Open in App

Setback to Sri Lanka against Team India, IND vs SL: भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून २७ जुलैपासून टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ काही दिवस आधीच जाहीर झाला होता. तर श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने काल या मालिकेसाठी संघ जाहीर केला. टी२० वर्ल्डकपमधील खराब कामगिरीमुळे वानिंदू हसरंगाने श्रीलंकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काल नव्या कर्णधारासह श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला होता. पण मालिका सुरु होण्याआधीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंता चामिरा ( Dushmanta Chameera ) याला दुखापतीमुळे आगामी भारत-श्रीलंका मालिकेतून माघार घ्यावी लागली असल्याचे समजते. चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघात दुश्मंता चामिराला सहभागी करण्यात आले होते. स्पोर्ट्स पॅव्हेलियन लंका यांच्या वृत्तानुसार, दुश्मंताला शेवटच्या क्षणाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. पण अद्याप त्याच्या जागी बदली खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आले नाही.

दरम्यान, श्रीलंका क्रिकेट निवड समितीनेही टी२० मालिका खेळण्यासाठी १६ खेळाडूंच्या संघाची निवड केली. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री हरिन फर्नांडो यांनी या संघाला काल मान्यता दिली. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या महिष तिक्षणा, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा यासारख्या अनेक स्टार्सचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ- चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा, बिनुरा फर्नांडो

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघश्रीलंका