Join us

IND Vs SL 3rd ODI Live : टॉस जिंकल्यावर शिखर धवननं केलं असं काही; प्रतिस्पर्धी कर्णधारासह सारेच पाहत राहिले, Video 

IND vs SL 3rd ODI Int Live Score : भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानं तिसऱ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:03 IST

Open in App

IND vs SL 3rd ODI Int Live Score : भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानं तिसऱ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यांत नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूनं लागला होता, पण आता धवनला यश मिळाले अन् त्यानं त्याचा आनंद लगेच साजरा केला. कॅच घेतल्यानंतर शिखर त्याच्या मांडीवर जोरात हात मारून नंतर तो हवेत उंचावतो... हाय फाईव्ह... टॉस जिंकल्यानंतरही त्यानं असेच केलं अन् सर्व जण हसू लागले. 

ICC T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार; फायनलमध्ये टीम इंडियाला लोळवणार!

भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1980 इंडियानं एकाच वन डे सामन्यात पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. आजच्या सामन्यात नवदीप सैनी हाही खेळणार असून भारतीय संघ सहा बदलांसह श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन सकारीया, के गोवथम आणि राहुल चहर यांनी आज पदार्पण केले. ( India are handing five debuts: Nitish Rana, Rahul Chahar, Chetan Sakariya, K Gowtham and Sanju Samson.) 

2015च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियानं ट्वेंटी-20 सामन्यात पाच जणांना पदार्पणाची कॅप दिली होती. स्टुअर्ट बिन्नी, मनीष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल आणि संदीप शर्मा यांनी तेव्हा पदार्पण केल होते. याच दौऱ्यावर संजू सॅसमननं दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून पदार्पण केले होते आणि आज पाच वर्षांनी त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यापूर्वी 1080-81 साली दीलिप दोशी, किर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच वन डे सामन्यातून पदार्पण केले होते.   

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाशिखर धवन