ICC T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार; फायनलमध्ये टीम इंडियाला लोळवणार!

ICC T20 World Cup: यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 2019नंतर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामन्याची मेजवानी मिळणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:23 PM2021-07-23T14:23:50+5:302021-07-23T14:24:19+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup: Shoaib Akhtar predicts India will lose to Pakistan in the final of T20 World Cup in UAE | ICC T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार; फायनलमध्ये टीम इंडियाला लोळवणार!

ICC T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार; फायनलमध्ये टीम इंडियाला लोळवणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup: Shoaib Akhtar predicts that India and Pakistan will play WC final says, Babar Azam’s side will beat Virat Kohli’s men : यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 2019नंतर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामन्याची मेजवानी मिळणार आहे. कोरोना संकटामुळे भारतात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय आणि अमिराती क्रिकेट बोर्डाच्या विद्यमानं ओमान, दुबई, शाहजाह व अबुधाबी येथे वर्ल्ड कपचे सामने होतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. पण, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानं पाकिस्तान यंदाचा वर्ल्ड कप जिंकेल आणि तेही फायनलमध्ये टीम इंडियाला लोळवेल, असा दावा केला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची फायनल होईल आणि पाकिस्तान जेतेपदाचा चषक उंचावेल असा दावा अख्तरनं केला.  ( India vs Pakistan). तो म्हणाला,''ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा फायनल मुकाबला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल व त्यात टीम इंडियाचा पराभव होईल, असे मला वाटते. यूएईतील हवामान व वातावरण हे भारत- पाकिस्तान या दोन्ही संघांच्या फायद्याची आहे.''

आयसीसी वर्ल्ड कप ( वन डे व ट्वेंटी-20) स्पर्धेत भारत-पाकिस्तान आतापर्यंत 11 वेळा भिडले अन् त्यात टीम इंडियानं बाजी मारली. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रम पाहता भारताचे पारडे 5-0 असे जड आहे. (India vs Pakistan). विराट व बाबर यांच्यातल्या तुलनेबद्दल बोलताना अख्तनं पाकिस्तानी कर्णधाराला धावांचा पाठलाग करताना अधिक धावा करण्याची गरज असल्याचे म्हटले. ''विराटला हरवायचे आहे आणि त्याला मागे टाकायचे आहे, तर बाबरनं धावांचा पाठलाग करताना अधिक धावा करायला हव्यात आणि ज्यापद्धतीनं विराट खेळतो तसंच खेळायला हवं. बाबरमध्ये पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज बनण्याची क्षमता आहे, परंतु त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. 10 वर्षानंतर विराट व बाबर यांच्यातली तुलना करून सर्वोत्तम ठरवू शकतो,''असेही अख्तर म्हणाला.

 

  • 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे. 
  • २००९, २०१० ला नव्हते झाले भारत- पाक सामने

भारत- पाकिस्तान सामना आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील सर्वांत उत्कंठापूर्ण आणि सर्वाधिक पाहिला जाणारा सामना असतो. आतापर्यंत झालेल्या सहा टी-२० विश्वचषकात केवळ दोनदा २००९ आणि २०१० मध्ये उभय संघांदरम्यान सामने झाले नव्हते. २००७ च्या विश्वचषकात तर फायनलसह उभय संघात दोनदा सामने झाले होते. २०१२ ला दोन्ही संघ सुपर ८ फेरीत परस्परांविरुद्ध खेळले. २०१४ आणि २०१६ ला भारत- पाक यांच्यात गटात सामने झाले होते.

पात्रता फेरीत सहभागी संघ

  • गट १ - श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया
  • गट २ - बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमा

 

सुपर १२ फेरीतील संघ

  • गट १ - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.
  • गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

Web Title: ICC T20 World Cup: Shoaib Akhtar predicts India will lose to Pakistan in the final of T20 World Cup in UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.