Join us  

IND Vs SL 3rd ODI Live : Record: ट्वेंटी-20 ते वन डे संघ, टीम इंडियाच्या खेळाडूला पाहावी लागली 6 वर्ष 4 दिवस वाट!

IND vs SL 3rd ODI Int Live Score : मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 4:41 PM

Open in App

IND vs SL 3rd ODI Int Live Score : मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानं तिसऱ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघानं तिसऱ्या वन डेत संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन सकारीया, के गोवथम आणि राहुल चहर यांना पदार्पणाची संधी दिली. यापैकी एका खेळाडूचे ट्वेंटी-20 संघातील पदार्पणानंतर तब्बल 6 वर्ष व 4 दिवसांनी टीम इंडियाच्या वन डे संघात पदार्पण झाले आहे. 

शिखर धवनने खणखणीत चौकार खेचून टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु 13 धावांवर त्याला माघारी जावे लागले. त्यानंतर पदार्पणवीर संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावा जोडल्या. या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. पृथ्वी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत होता, तर पदार्पणवीर संजूची फटक्यांची नजाकत पाहून चाहते आनंदी झाले. पृथ्वी 49 चेंडूंत 8 चौकारांसह 49 धावांवर पायचीत झाला. संजूनेही सुरेख फटकेबाजी केली अन् प्रविण जयविक्रमा गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असलेल्या असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा प्रयत्न फसला. फर्नांडोनं हवेत झेपावत सुरेख झेल टिपून संजूला 46 धावांवर ( 5 चौकार व 1 षटकार) माघारी जावं लागलं.

ICC T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार; फायनलमध्ये टीम इंडियाला लोळवणार!

1980 इंडियानं एकाच वन डेत पाच खेळाडूंचे पदार्पण 2015च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियानं ट्वेंटी-20 सामन्यात पाच जणांना पदार्पणाची कॅप दिली होती. स्टुअर्ट बिन्नी, मनीष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल आणि संदीप शर्मा यांनी तेव्हा पदार्पण केल होते. याच दौऱ्यावर संजू सॅसमननं दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून पदार्पण केले होते आणि आज पाच वर्षांनी त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यापूर्वी 1080-81 साली दीलिप दोशी, किर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच वन डे सामन्यातून पदार्पण केले होते.  

6 वर्ष व 4 दिवस...संजू सॅमसननं 2015च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर ट्वेंटी-20 संघात पदार्पण केलं होतं आणि त्याला वन डे संघात पदार्पणासाठी 6 वर्ष व 4 दिवस वाट पाहावी लागली. याआधी कृणाल पांड्याला 2 वर्ष व 139 दिवस, राहुल चहरला 1 वर्ष व 351 दिवस आणि रिषभ पंतला 1 वर्ष व 262 दिवस वाट पाहावी लागली होती.  ट्वेंटी-20 संघातील पदार्पणानंतर संजूनं 2196 दिवसानंतर वन डे संघात पदार्पण केले. सचिन तेंडुलकरला वन डे पदार्पणानंतर 6192 दिवसानंतर ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. ( Sachin Tendulkar has the highest difference other way around, making T20I debut 6192 days after his ODI debut) 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासंजू सॅमसनशिखर धवनपृथ्वी शॉ