Join us

IND vs SL 2nd T20I Live : ऋतुराजचे रेकॉर्ड चांगले असूनही हार्दिकने त्याला वगळले; भारताने Playing XI मध्ये दोन बदल केले 

India vs Sri Lanka 2nd T20I Live : संजू सॅमसन व हर्षल पटेल यांना बाहेर बसावे लागले. संजूने दुखापतीमुळे मालिकेतूनच माघार घेतली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:38 IST

Open in App

India vs Sri Lanka 2nd T20I Live : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा ट्वेंटी-२० सामना आज पुण्यात खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माचा ( Jitesh Sharma) समावेश केला आहे. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी होतीच आणि तसेच झाले. संजूच्या जागी ऋतुराज गायकवाड किंवा राहुल त्रिपाठी यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता होती. 

ऋतुराजने टीम इंडियासाठी ८ ट्वेंटी-२०  आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याने १३५ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलच्या ३६ सामन्यांत १२०७ धावा केल्या आहेत. राहुल अद्याप टीम इंडियासाठी एकाही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. त्याने आयपीएलच्या ७४ डावांमध्ये २७.६६ च्या सरासरीने १७९८ धावा केल्या आहेत. पण, हार्दिकने राहुलची निवड केली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल त्रिपाठी आणि अर्शदीप सिंग आजच्या सामन्यात खेळणार आहेत आणि संजू सॅमसन व हर्षल पटेल यांना बाहेर बसावे लागले. संजूने दुखापतीमुळे मालिकेतूनच माघार घेतली आहे. 

भारतीय संघ- हार्दिक पांड्या, शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, शिवम मावी, उम्रान मलिक, युझवेंद्र चहल

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाऋतुराज गायकवाडअर्शदीप सिंग
Open in App