Join us

Jeffrey Vandersay, IND vs SL: दमदार सुरुवातीनंतर 'टीम इंडिया एक्सप्रेस' रुळावरून घसरली; जेफ्री वँडरसेचा जोरदार 'पंच'!

Jeffrey Vandersay, IND vs SL: भारताच्या पहिल्या सहाच्या सहा फलंदाजांच्या विकेट्स जेफ्री वँडरसेने घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 20:32 IST

Open in App

Jeffrey Vandersay, IND vs SL 2nd ODI Live Updates: टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने दुसऱ्या वन-डेमध्ये भारतापुढे २४१ धावांचे आव्हान ठेवले. फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर सलामीवीर अविष्का फर्नांडो (४०), कामिंडु मेंडिस (४०) आणि दुनिथ वेल्लालागे (३९) या फलंदाजांच्या चिवट खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २४० धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या जेफ्री वँडरसे याने भारतीय संघाला जोरदार 'पंच' देत सर्वोत्तम कामगिरी केली.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने आपल्या नेहमीच्या पद्धतीने सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ९७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. त्याने डावाला चांगली सुरुवात मिळवून दिली. पण जेफ्री वँडरसेच्या वादळाने भारताचा डाव गडगडला. रोहित शर्माने रिव्हर्स स्वीप खेळताना झेलबाद झाला. त्यानंतर शुबमन गिल ३५ धावांवर झेल देवून बसला. पुढे विराट कोहली (१४), शिवम दुबे (०) आणि श्रेयस अय्यर (७) या तिघांनाही जेफ्रीने पायचीत केले. त्यानंतर अनुभवी के एल राहुलचा (०) त्याने त्रिफळा उडवला.  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुलश्रेयस अय्यर