Join us

IND vs SL, 2nd ODI Live: भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 21:12 IST

Open in App

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या निकालासह भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कुलदीप यादवने पुनरागमनाचा सामना गाजवला आणि मोहम्मद सिराजने त्याला साजेशी साथ दिली. फलंदाजीत लोकेश राहुलने संयमी खेळ करताना भारताचा विजय निश्चित केला. भारताने हा विजय मिळवून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबर केली.  

कुलदीप व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. उम्रान मलिकने दोन विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव ३९.४ षटकांत २१५ धावांवर गुंडाळला. अविष्का फर्नांडो ( २०), कुसल मेंडिस ( ३४) यांनी चांगला खेळ केला. पदार्पणवीर नुवानिदू फर्नांडोने अर्धशतक झळकावताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्मा ( १७) व शुभमन गिल ( २१) यांना मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( २८ ) हेही माघारी परतले.  लोकेश राहुल व हार्दिक पांड्या यांनी श्रीलंकेच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले. या दोघांनी संयमी खेळ करताना ११९ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली. हार्दिक ५३ चेंडूंत ३६ धावांवर माघारी परतला. 

लोकेश १०३ चेंडूंत  ६ चौकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला, कुलदीपने नाबाद १० धावा केल्या. भारताने ४३.२ षटकांत ६ बाद २१९ धावा करून विजय मिळवला. भारताचा वन डे क्रिकेटमधील श्रीलंकेवरील हा ९५ वा विजय ठरला आणि वन डे क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरोधात सर्वाधिक विजयाच्या ऑस्ट्रेलियाच्या ( वि. न्यूझीलंड) वर्ल्ड रेकॉर्डशी भारताने बरोबरी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाआॅस्ट्रेलियान्यूझीलंड
Open in App