Join us

Ishan Kishan, IND vs SL, 1st T20I Live Update : इशान किशनने धो डाला!; रोहित शर्मा अन् श्रेयस अय्यर यांचीही तुफान फटकेबाजी

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 20:40 IST

Open in App

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. रोहित ३२ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर माघारी परतला, परंतु इशानची आतषबाजी काही थांबता थांबत नव्हती, पण शतकाच्या उंबरठ्यावरून त्याला माघारी फिरावे लागले. त्यानंतर श्रेयस अय्यरने  हात सैल करताना चौकार-षटकार खेचले. 

इशान किशन आणि रोहित यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. इशान किशन आज तुफान फॉर्मात होता. तो श्रीलंकेच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला. ७व्या षटकात जेफरी वंदेर्सायच्या गोलंदाजीवर इशानचा फटका चूकला अन् चेंडू हवेत उडाला, परंतु लियानागे हे झेल टिपण्यात चूक केली. इशानला ४३ धावांवर जीवदान मिळाले.  इशानने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याआधी रोहित शर्माने ३८ धावा करून मोठा विक्रम मोडला. १२ व्या षटकात लाहिरू कुमाराने ही भागीदारी तोडली. त्याने रोहित शर्माला ४४ धावांवर त्रिफळाचीत केले. इशान व रोहितने पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या.  श्रेयस अय्यर अधिक स्ट्राईक इशानलाच देण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि इशानही चौफेर फटकेबाजी करून फलंदाजीचा आस्वाद लुटत होता. 

१७व्या षटकात इशान बाद झाला. त्याने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८९ धावा कुटल्या. त्यानंतर श्रेयसने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला २ बाद १९९ धावांचा पल्ला गाठून दिला. श्रेयस २८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर नाबाद राहिला.  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाइशान किशनरोहित शर्माश्रेयस अय्यर
Open in App