Join us

India vs South Africa 1st test Day 1: पहिला दिवस 'टीम इंडिया'चा! KL राहुलचा शतकी धमाका, मयंकचंही अर्धशतक

संपूर्ण दिवसात भारतीय फलंदाजांनी खेळावर वर्चस्व राखलं. केएल राहुलने शेवटपर्यंत नाबाद राहत १२२ धावा कुटल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 21:15 IST

Open in App

India vs South Africa 1st Test, KL Rahul Century: आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाने वर्चस्व राखलं. भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल याचे नाबाद शतक आणि मयंक अग्रवालचे झुंजार अर्धशतक यांच्या जोरावर भारताने दिवसअखेर ३ बाद २७२ धावांपर्यंत मजल मारली. चेतेश्वर पुजारा वगळता इतर सर्व फलंदाजांना चांगली सुरूवात मिळाली. पण मयंक आणि कर्णधार विराट कोहलीला मोठी खेळी उभारता आली नाही. आफ्रिकेकडून तीनही बळी लुंगी एन्गीडीने घेतले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाला सलामीवीरांनी सार्थ ठरवलं. पहिल्या सत्रात राहुल-मयंक जोडीने ८३ धावांची नाबाद भागीदारी केली. दुसऱ्या सत्रात सुरुवातीलाच मयंकने अर्धशतक पूर्ण केलं. पण लुंगी एन्गीडीच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. त्याला पंचांनी बाद ठरवल्यानंतर सोशल मीडियावर तो निर्णय वादग्रस्त असल्याचं अनेक चाहत्यांनी लिहिलं. पण मयंकने DRS न घेता परतीचा मार्ग स्वीकारला.

मयंक पाठोपाठ पुढच्याच चेंडूवर चेतेश्वर पुजारा एन्गीडीने झेलबाद केले. त्यामुळे विराट कोहली राहुलची साथ देण्यास आला. राहुलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विराटही पिचवर सेट झाला होता. पण ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या एका चेंडूवर त्याने बॅट लावली आणि तो झेलबाद झाला. त्यानंतर अनेक दिवस चर्चेत असलेला अजिंक्य रहाणे मैदानात आला. त्याने दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुलला उत्तम साथ दिली. राहुलने या दरम्यान आपलं सातवं कसोटी शतक साजरं केलं. पहिला दिवस संपला तेव्हा राहुल नाबाद १२२ आणि अजिंक्य रहाणे नाबाद ४० धावांवर खेळत होते.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामयांक अग्रवाललोकेश राहुलअजिंक्य रहाणे
Open in App