Join us

IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)

...अन् सेट झालेली जोडी फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 21:59 IST

Open in App

IND vs SA Womens World Cup 2025 Final, Tazmin Brits Run Out Watch Amanjot Kaur  Rocket Throw :   भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील विश्वचषकातील अंतिम सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २९९ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड आणि तझमिन ब्रिट्स या दोघींनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. भारतीय गोलंदाजी या जोडीसमोर कुठंतरी फिकी पडतीये, असे वाटत असताना अमनजोत कौरनं सर्वोत्तम फिल्डिंगचा नजराणा पेश करत ही जोडी फोडली. कमालीच्या रॉकेट थ्रोसह अमनजोतनं ब्रिट्सचा खेळ खल्लास केला. रन आउटच्या रुपात मिळालेली ही विकेट टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी अशीच होती.

इथं पाहा अमनजोत कौरचा रॉकेट थ्रो अन् टीम इंडियाला मिळालेली पहिली विकेट

English
हिंदी सारांश
Web Title : Amanjot Kaur's 'rocket throw' gives India a major breakthrough!

Web Summary : In the Women's World Cup final, India set a target of 299. South Africa's strong start was broken by Amanjot Kaur's sensational fielding. Her direct hit run-out of Tazmin Brits provided a crucial breakthrough for India.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका