IND vs SA Womens World Cup 2025 Final, Tazmin Brits Run Out Watch Amanjot Kaur Rocket Throw : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील विश्वचषकातील अंतिम सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २९९ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड आणि तझमिन ब्रिट्स या दोघींनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. भारतीय गोलंदाजी या जोडीसमोर कुठंतरी फिकी पडतीये, असे वाटत असताना अमनजोत कौरनं सर्वोत्तम फिल्डिंगचा नजराणा पेश करत ही जोडी फोडली. कमालीच्या रॉकेट थ्रोसह अमनजोतनं ब्रिट्सचा खेळ खल्लास केला. रन आउटच्या रुपात मिळालेली ही विकेट टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी अशीच होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इथं पाहा अमनजोत कौरचा रॉकेट थ्रो अन् टीम इंडियाला मिळालेली पहिली विकेट
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना लॉरा आणि ब्रिट्स यांनी नवव्या षटकातच अर्धशतकी भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले होते. रेणुका सिंह ठाकूर घेऊन आलेल्या १० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ब्रिट्सनं मिडविकेटच्या दिशेनं फटका खेळला आणि कर्णधार लॉराला चोरटी धाव घेण्यासाठी कॉल केला. अमनजोत कौरनं चपळाईन चेंडू अडवून तो थेट स्टंपवर निशाणा साधला. एक स्टंप दिसेल अशा अँगलवरून अमनजोत कौरनं रॉकेट थ्रोसह ब्रिट्सचा खेळ खल्लास करत भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली. ही विकेट टीम इंडियासाठी मोठा दिलासा देणारी अशी होती. ब्रिट्सनं ३५ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २३ धावांची खेळी केली.
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
एकापाठोपाठ दुसरी विकेट आली, पण...
क्रिकेटमध्ये एक विकेट मिळाली की, त्यासोबत दुसरी विकेटही येते. इथंही तेच घडलं. १० व्या षटकापर्यंत पहिल्या विकेटची प्रतिक्षा केल्यावर १२ व्या षटकात श्री चरणीनं ब्रिट्सची जागा घेण्यासाठी आलेल्या बॉशला शून्यावर माघारी धाडले. या दोन विकेट्स टीम इंडियाला मॅचमध्ये आणणारा आहे. जोपर्यंत लॉरा आहे तोपर्यंत टीम इंडियासाठी ही लढाई सोपी नसेल.