Jasprit Bumrah No Ball Controversy Know About Cricket Law 21.5 Explained No Ball : कटकच्या बाराबती स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अक्षरश: गुडघे टेकायला भाग पाडले. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७५ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारतीय जलदगती गोलंदाजी आक्रमणासह फिरकीतील जादू पाहायला मिळाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराच्या विक्रमी कामगिरी
या सामन्यात जसप्रीत बुमराहनं डेवॉल्ड बेविसच्या रुपात आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात शंभरावी विकेट आपल्या खात्यात जमा केली. या विकेटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० विकेट्स घेणारा बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. पण त्याने ज्या चेंडूवर विकेट घेतली तो नो बॉल होता, असा वाद सुरु आहे. मैदानातील पंचांनी टेलिव्हिजन अंपायरची मदत घेऊन विकेट निश्चित झाली. तरीही काहींना ही विकेट वादग्रस्त ठरताना दिसते. इथं जाणून घेऊयात नेमंक काय घडलं? बुमराहच्या नो बॉलवर दक्षिण आफ्रिकेला फ्री हिट मिळण्याऐवजी खरचं भारतीय संघालाा चुकीच्या पद्धतीने विकेट मिळाली का? ICC चा नियम काय सांगतो? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले...
नो बॉलचा नियम काय सांगतो?
MCC (मेरीलबोन क्रिकेट क्लब) नियमातील २१.५ मध्ये गोलंदाजाच्या पायाच्या नो बॉलसंदर्भात उल्लेख आहे. या नियामुसार गोलंदाजी करताना गोलंदाजाचा समोरचा पाय (Front Foot) आणि पाठीमागचा पाय (Back Foot) कुठे पडतो हे खूप महत्त्वाचं आहे. समोरील पायाचा काही भाग तरी पॉपिंग क्रीजच्या मागे असला पाहिजे. चेंडू रिलीज करण्याआधी पाय रेषेबाहेर असेल तर तो बॉल ठरतो. याशिाय बॅक-फूटने रिटर्न क्रीजला स्पर्श करता कामा नये. जर पाय रेषेच्या बाहेर गेला किंवा रेषेला स्पर्श झाला चेंडू नो बॉल घोषित केला जातो.
खरंच बुमराहनं मर्यादा ओलांडली का?
बुमराहनं गोलंदाजी करताना मर्यादा ओलांडली. पण थर्ड अंपायर केएन अनंथा पद्मनाभन यांनी रिप्ले पाहिल्यावर बुमराहचा पाय हा रेषेवर होता, असे सांगत चेंडू वैध ठरवला अन् डेवॉन ब्रेविसला तंबूचा रस्ता धरावा लागला. सोशल मीडियाव वेगवेगळ्या अँगलसह फोटो व्हायरल होत असून थर्ड अंपायरनं चुकीचा निर्णय दिला, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. ब्रेविसनं या सामन्यात १४ चेंडूत २२ धावा केल्या.