ICC T20 World Cup 2026 Super 8 South Africa Have Defeated India By 76 Runs : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघावर लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली. गत उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चॅम्पियन टीम इंडियाला पराभूत करत टीम इंडियाची ICC स्पर्धेतील सलग १७ विजयाची मालिका खंडीत केली आहे. एवढेच नाही तर टी-२० मध्ये भारतीय संघाला दुसऱ्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
डेविड मिलर, डेवॉल्ड ब्रेविस आणि ट्रिस्टन स्टब्सच्या फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या सामन्यात निर्धारित २० षटकात ७ बाद १८७ धावा करत टीम इंडियासमोर १८८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघातील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अखेरच्या षटकात शिवम दुबेन केलेल्या फटकेबाजीशिवाय अन्य एकालाही मैदानात तग धरता आला नाही. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ १८.५ षटकात १११ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ७६ धावांनी सामना जिंकत सेमी फायनलचा आपला मार्ग सुकर केला आहे. दुसरीकडे टीम इंडियावर आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली. एवढेच नाही तर सेमी फायनलचा मार्गही खडतर झाला आहे.
धावफलकावर ५१ धावा असताना टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत
नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. मार्करम घेऊन आलेल्या पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर ईशान किशन शून्याव बाद झाला. मार्को यान्सेन याने तिलक वर्मा १ (२) आणि अभिषेक शर्मा १५ (१२) धावांवर माघारी धाडत टीम इंडियाला धक्क्यावर धक्के दिले. कॉर्बिन बॉशनं वॉशिंग्ट सुंदर ११ (११) आणि कर्णधार सूर्यकुमारला १८ (२२) आपल्या जाळ्यात अडकले. धावफलकावर अवघ्या ५१ धावा असताना टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
फलंदाजीत पांड्या-रिंकूही ठरले अपयशी
टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतल्यावर लोअर ऑर्डरमध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेसह रिंकू सिंह याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. शिवम दुबेनं ३७ चेंडूत केलेल्या ४२ धावांच्या खेळीशिवाय अन्य कोणालाही धमक दाखवता आली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून मार्को यान्सेन याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. केशव महाराजने एकाच षटकात ३ विकेट्सचा डाव साधला.
Web Summary : Team India faced a crushing defeat against South Africa in the T20 World Cup. South Africa set a target of 188, which India failed to chase, collapsing for 111. Only Shivam Dube showed some resistance. India's 17-match winning streak ended, jeopardizing their semi-final chances.
Web Summary : टी20 विश्व कप में दक्षिण अफ्रीका ने भारत को करारी शिकस्त दी। दक्षिण अफ्रीका ने 188 रनों का लक्ष्य रखा, जिसका पीछा करने में भारत विफल रहा और 111 रनों पर ढेर हो गया। केवल शिवम दुबे ने कुछ प्रतिरोध दिखाया। भारत की 17 मैचों की जीत का सिलसिला खत्म, सेमीफाइनल की संभावनाएं खतरे में।