भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सख्खे भाऊ आमने-सामने येणार; दोघांची प्रतिष्ठा पणाला

IND vs SA T20 : आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:50 IST2026-02-22T11:48:21+5:302026-02-22T11:50:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA T20: Two brothers will come face to face in the India vs South Africa match; Whose side will be stronger? | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सख्खे भाऊ आमने-सामने येणार; दोघांची प्रतिष्ठा पणाला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सख्खे भाऊ आमने-सामने येणार; दोघांची प्रतिष्ठा पणाला

IND vs SA T20 : आयसीसी टी-२०वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेने ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता, आज (२२ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. आरजचा सामना दोन्ही संघांच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा सामना केवळ मैदानावरील खेळापुरता मर्यादित नसून, डगआउटमध्येही एक वेगळीच लढत पाहायला मिळणार आहे. 

डगआउटमध्ये सख्खे भाऊ आमने-सामने...

या सामन्याला विशेष रंगत येण्याचे कारण म्हणजे दोन सख्खे भाऊ समोरासमोर उभे ठाकले आहेत. मोर्ने मोर्केल सध्या भारतीय संघाचा बॉलिंग कोच असून, गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील महत्त्वाचा चेहरा आहेत. तर, त्याचा मोठा भाऊ एल्बी मोर्केल हा दक्षिण आफ्रिकन संघाचा स्पेशलिस्ट कन्सल्टंट म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

मोर्ने मोर्केल : भारतीय गोलंदाजीचा कणा

41 वर्षीय मोर्ने मोर्केल याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. 86 कसोटी, 117 वनडे आणि 44 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 544 विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची तंत्रे, ताकद आणि कमकुवत दुवे यांची त्याला खोलवर माहिती आहे. 

    

एल्बी मोर्केल : IPL अनुभवावर दक्षिण आफ्रिकेची भिस्त

44 वर्षीय एल्बी मोर्केल याचा टी20 क्रिकेटमधील अनुभवही तितकाच मोलाचा आहे. 1 कसोटी, 58 वनडे आणि 50 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 1412 धावा आणि 77 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, एल्बी मोर्केल याने आयपीएलमध्ये दीर्घकाळ चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळले असून, स्टीफन फ्लेमिंग यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे भारतीय खेळपट्ट्या, स्थानिक परिस्थिती आणि टी२० रणनीतीचे उत्तम ज्ञान आहे.

मोर्केल बंधुंच्या आईची कोंडी

एल्बी मोर्केल याने या सामन्याबाबत मिश्किल प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आम्ही या सामन्याबाबत एकमेकांशी चर्चा करत नाही. मात्र आमची आई जरा गोंधळलेली आहे. तिला कळत नाही नेमकं कुणाला पाठिंबा द्यायचा!”

‘मोर्केल फॅक्टर’ ठरणार निर्णायक?

रविवारी काही तासांसाठी मोर्केल कुटुंबही दोन भागांत विभागले जाईल. भारतासाठी मोर्ने मोर्केल दक्षिण आफ्रिकेच्या संघातील अंतर्गत माहिती आणि फलंदाजांविषयीची आपला अनुभव वापरणार आहे, तरतर दक्षिण आफ्रिकेसाठी एल्बी मोर्केल आयपीएलमधील अनुभव आणि भारतीय खेळपट्टीच्या ज्ञानासह मैदानात उतरेल. रक्ताचं नातं एका बाजूला अन् व्यावसायिक जबाबदारी दुसऱ्या बाजूला. कदाचित हाच ‘मोर्केल फॅक्टर’ सुपर-८ टप्प्यातील पहिला महत्त्वाचा विजय ठरवू शकतो.

Web Title : भारत बनाम दक्षिण अफ्रीका: कोचिंग में भाई आमने-सामने

Web Summary : टी20 विश्व कप में भारत और दक्षिण अफ्रीका का महत्वपूर्ण मुकाबला। मोर्ने मोर्कल (भारत के गेंदबाजी कोच) और एल्बी मोर्कल (दक्षिण अफ्रीका के सलाहकार) भाइयों के बीच कोचिंग की टक्कर मैच को और रोमांचक बनाएगी।

Web Title : India vs. South Africa: Brothers to Face Off in Coaching Roles

Web Summary : India and South Africa clash in a crucial T20 World Cup match. Adding spice, brothers Morne Morkel (India's bowling coach) and Albie Morkel (South Africa's consultant) will strategize against each other, creating a unique family rivalry on the field.