IND vs SA : फक्त १५ धावा अन् सूर्यकुमार यादव मोडणार विराट कोहलीचा मोठा विक्रम

IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-१ असा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 02:59 PM2023-12-04T14:59:14+5:302023-12-04T14:59:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA :  Suryakumar Yadav set to break Virat Kohli’s T20I record for India | IND vs SA : फक्त १५ धावा अन् सूर्यकुमार यादव मोडणार विराट कोहलीचा मोठा विक्रम

IND vs SA : फक्त १५ धावा अन् सूर्यकुमार यादव मोडणार विराट कोहलीचा मोठा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-१ असा विजय मिळवला. आता दक्षिण आफ्रिका दौरा गाजवण्यासाठी सूर्यकुमार अँड टीम सज्ज झाली आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार करणार आहे आणि त्याला आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहलीचा ( Virat Kohli) मोठा विक्रम तोडण्यासाठी केवळ १५ धावा करण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वात जलद २००० धावांचा विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी सूर्यकुमार यादवकडे आहे.


सूर्याने ५५ इनिंग्जमध्ये १९८५ धावा केल्या आहेत आणि आफ्रिकेविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२०त १५ धावा करताच तो भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये ट्वेंटी-२०त २००० धावा करणारा फलंदाज बनेल. विराटने ५६ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला आहे. पाकिस्तानचा बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी ५२ इनिंग्जमध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त हा पराक्रम केला आहे. भारतीयांमध्ये लोकेश राहुल ( ५८) व रोहित शर्मा ( ७७) हेही या विक्रमाच्या यादीत येतात.


इंग्लंडविरुद्ध २०२१ मध्ये पदार्पण केल्यानंतर सूर्यकुमारने या फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवले आहे. ३३ वर्षीय फलंदाज ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याने ५८ ट्वेंटी-२०मध्ये १६ अर्धशतकं व ३ शतकं झळकावली आहेत. त्याची धावांची सरासरी ही ४४.११ आहे, जी भारतीय फलंदाजांमध्ये दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे.  
ट्वेंटी-२० मालिका 

१० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
१२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून
१४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून

वन डे मालिका
१७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून
१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 
२१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून

कसोटी मालिका
२६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून
३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून
 

Web Title: IND vs SA :  Suryakumar Yadav set to break Virat Kohli’s T20I record for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.