भारतात येऊन कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला पराभूत करणे नेहमीच कठीण मानले जात होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध ३-० ने पराभव स्वीकारल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्याच्या मालिकेत भारत क्लीन स्वीप होण्याच्या मार्गावर आहे. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीदरम्यान दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली.
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शुक्री कॉनराड यांनी भारतीय संघाच्या जखमांवर मीठ चोळण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी भारताला पराभूत करण्याची त्यांची रणनीती स्पष्ट केली. कॉनराड म्हणाले की, “भारताला शक्य तितका वेळ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उभे ठेवायचे आणि थकवायचे, हेच आमचे लक्ष्य होते. एक प्रसिद्ध वाक्य वापरायचे तर, भारतीय संघाने अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण घालावे, असे आम्हाला वाटते. आम्हाला त्यांना सामन्यात परतण्याची कोणतीच संधी द्यायची नव्हती आणि अखेरच्या दिवशी व चौथ्या दिवसाच्या अखेर फलंदाजी करण्याचे आव्हान द्यायचे होते."
टीम इंडियाची अवस्था बिकट
पहिल्या डावात १८८ धावांची मोठी आघाडी असूनही, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ५ बाद २६० धावांवर डाव घोषित केला आणि भारताला विजयासाठी ५२२ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य दिले. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यामुळे टीम इंडिया आणखी अडचणीत आली. सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला अजूनही ४०० हून अधिक धावांची आवश्यकता आहे. तर, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ ३ विकेट्सची गरज आहे.
दक्षिण आफ्रिका मालिकेवर नाव कोरण्याच्या वाटेवर
सध्याच्या स्थितीवरून, टीम इंडियाला हा सामना जिंकणे जवळपास अशक्य आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या १-० ने आघाडीवर आहे आणि हा सामना जिंकून क्लीन स्वीपच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्याच्या स्थितीवरून, टीम इंडियाला हा सामना जिंकणे जवळपास अशक्य आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या १-० ने आघाडीवर आहे आणि हा सामना जिंकून क्लीन स्वीपच्या दिशेने वाटचाल करत आहे.