वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...

...अन् वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताची शतकी पाटी पुन्हा राहिली कोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 20:17 IST2025-11-02T20:14:42+5:302025-11-02T20:17:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA Shafali Verma Miss Century But Creates History For India Breaks Punam Raut's All Time Record In World Cup Final MS Dhoni Gautam Gambhir | वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...

वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...

Shafali Verma Miss Century But Creates History : भारताची सलामीची युवा बॅटर शफाली वर्मानं नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये विक्रमी खेळी केली. प्रतीका रावलच्या दुखापतीमुळे वर्षभरानंतर टीम इंडिया वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळालेल्या शफालीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात जबरदस्त खेळीसह लक्षवेधून घेतलं. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शफालीची जबरदस्त खेळी, धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...

शफालीला या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि टीम इंडियाचा विद्यमान प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटर गंभीर यांना मागे टाकण्याचा डाव साधण्याची मोठी संधी होती. पण अवघ्या १३ धावांनी तिचं शतक हुकलं अन् ही संधी हुकली. पण  ७८ चेंडूत ८७ धावांची उपयुक्त खेळी करत  तिने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावे झाला आहे. तिने माजी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत चा विक्रम मोडीत काढला. पूनम राऊत हिने २०१७ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानात ८६ धावांची खेळी केली होती.

IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शतकी पाटी कोरीच

आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात आतापर्यंत एकाही भारतीयाने शतक झळकावलेले नाही. २०११ च्या पुरुष विश्वचषक स्पर्धेत गौतम गंभीरचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं होते. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात गंभीरनं ९७ धावांची खेळी केली होती. याच सामन्यात महेंद्रिंह धोनीनं ९१ धावांची नाबाद खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमधील ८७ धावांच्या खेळीसह शफाली या यादीत तिसऱ्या तर पूनम राऊत ८६ धावांच्या खेळीसह चौथ्या क्रमांकावर आहे.

स्मृतीच्या रुपात पहिला धक्का बसल्यावर जेमीसह डावाला दिला आकार

प्रतीका रावल दुखापतग्रस्त झाल्यावर जवळपास वर्षभरानंतर शफाली वर्माची थेट सेमीफायनलमध्ये टीम इंडियात एन्ट्री झाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात तिला मोठी खेळी करता आली नव्हती. पण फायनलमध्ये तिने स्मृतीच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचत संघाला दमदार सुरुवात करून दिली. जेमिमा रॉड्रिग्जसोबत तिने ६१ चेंडूत ६२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: IND vs SA Shafali Verma Miss Century But Creates History For India Breaks Punam Raut's All Time Record In World Cup Final MS Dhoni Gautam Gambhir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.