IND vs SA Rohit Sharma Breaks Pakistan Shahid Afridi World Record Most Sixes In ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांचीच्या मैदानातील वनडे सामन्यात रोहित शर्मानं हिट शो दाखवून देत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढत रोहित शर्मानं विश्वविक्रमाला गवसणी घातली. ३५२ षटकारांसह तो आता वनडेतील सिक्सर किंग ठरला आहे. आफ्रिदीनं आपल्या वनडे कारकिर्दीत ३५२ षटकार मारले होते. त्यापाठोपाठ या यादीत वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा नंबर लागतो. कॅरेबियन स्फोटक बॅटरनं आपल्या वनडे कारकिर्दीत ३३१ षटकार मारले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
- रोहित शर्मा- ३५२*
- शाहिद आफ्रिदी- ३५१
- ख्रिस गेल- ३३१
- महेंद्रसिंह धोनी-२२९
IND vs SA : MS धोनीच्या घरच्या मैदानात 'रो-को'नं रचला इतिहास! सचिन-द्रविड जोडीचा महारेकॉर्ड मोडला
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार अर्धशतक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची वनडे सामन्यात रोहित शर्मानं आपल्या वनडे कारकिर्दीतील ६० वे अर्धशतक झळकावले. या खेळीचं तो मोठ्या खेळीत रुपांतर करेल, असे वाटत असताना मार्को यान्सेन याच्या चेंडूवर तो फसला. पायचितच्या रुपात त्याने आपली विकेट गमावली. रोहित शर्मानं ५१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार मारले. या डावातील ३ षटकारांसह तो वनडेतील नवा सिक्सर किंग ठरला आहे. वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या चार फलंदाजांमध्ये रोहितसह महेंद्रसिंह धोनीचाही समावेश आहे. धोनीनं आपल्या वनडे कारकिर्दीत २२९ षटकार मारले आहेत.
रोहित-विराटचा जलवा! शतकी भागीदारीसह लुटली मैफील
रोहित शर्मानं यशस्वी जैस्वालच्या साथनं डावाला सुरुवात केली. यशस्वी जैस्वालच्या रुपात २५ धावांर भारतीय संघाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर रोहित-विराट जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०९ चेंडूत १३६ धावांची भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : Rohit Sharma achieved a major milestone in the Ranchi ODI against South Africa. He broke Shahid Afridi's world record, becoming the ODI 'Sixer King' with 352 sixes. Chris Gayle follows Afridi in the list of most sixes.
Web Summary : रोहित शर्मा ने दक्षिण अफ्रीका के खिलाफ रांची वनडे में बड़ी उपलब्धि हासिल की। उन्होंने 352 छक्कों के साथ शाहिद अफरीदी का विश्व रिकॉर्ड तोड़ दिया और वनडे 'सिक्सर किंग' बन गए। क्रिस गेल इस सूची में अफरीदी के बाद हैं।