Join us

IND vs SA ODI, India Squad Announced: रोहित शर्मा संघाबाहेर; KL राहुल कर्णधार तर बुमराह उपकर्णधार

दक्षिण आफिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा अद्यापही असल्याने राहुलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपदाची नवी जबाबदारी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 21:14 IST

Open in App

दक्षिण आफिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा अद्यापही असल्याने राहुलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपदाची नवी जबाबदारी मिळाली. भारताचा वन डे आणि टी २० कर्णधार रोहित शर्मा हा अनफिट असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. कसोटी मालिकेआधी सराव करताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कसोटी मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. वन डे मालिकेआधी तो तंदुरूस्त होईल, अशी चर्चा होती. त्यामुळे संघ निवडीला उशीर झाला. पण अखेर रोहित अनफिट असल्यामुळे राहुलच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर करण्यात आला.

भारताचा संघ- केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

 

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळून झाल्यानंतर वन डे मालिका खेळणार आहे. १९ जानेवारीपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना १९ तारखेला तर दुसरा सामना २१ तारखेला बोलंड पार्क, पार्ल येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना २३ जानेवारीला केपटाऊनला खेळण्यात येणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मालोकेश राहुलजसप्रित बुमराह
Open in App