भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया पराभवाच्या छायेखाली दिसत असली तरी, भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जडेजाने आता कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५० विकेट्स पूर्ण केले आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने ४० डावांमध्ये ५४ विकेट्स घेतले. माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने २५ डावांमध्ये ६४ विकेट्स घेतले आहेत. हरभजन सिंग १९ डावांमध्ये ६० विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. माजी फिरकी गोलंदाज रवी अश्विन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, त्याने २६ डावांमध्ये ५७ विकेट्स घेतले आहेत. या यादीत रवींद्र जाडेजाचा समावेश झाला आहे. जडेजाने आता १९ डावांमध्ये ५० विकेट्स घेतले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स
| गोलंदाज | विकेट्स | डाव |
| अनिल कुंबळे | ५४ | ४० |
| जवागल श्रीनाथ | ६४ | २५ |
| हरभजन सिंग | ६० | १९ |
| रवी अश्विन | ५७ | २६ |
| रवींद्र जडेजा | ५०+ | १९ |
गुवाहाटी कसोटी सामन्यात टीम इंडिया सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ४८९ धावा केल्या. तर, प्रत्युत्तरात टीम इंडिया पहिल्या डावात केवळ २०१ धावांवर ऑलआउट झाली. चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २२० धावा केल्या, ज्यामुळे त्यांनी ५०० पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली. भारतीय संघाला हा सामना वाचवण्यासाठी आता अविश्वसनीय कामगिरी करावी लागणार आहे.