रांची: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका पार पडल्यानंतर आजपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. मात्र पावसाच्या विलंबामुळे सामन्यात व्यत्यय आला असून अनिश्चित काळासाठी सामन्याची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. लखनौमध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रजत पाटिदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, एडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक पहिला एकदिवसीय सामना - 6 ऑक्टोबर, रांचीदुसरा एकदिवसीय सामना - 9 ऑक्टोबर, लखनौतिसरा एकदिवसीय सामना - 11 ऑक्टोबर, दिल्ली