Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA : मिलरची किलर खेळी; स्टब्सची बॅटही तळपली! द. आफ्रिकेनं टीम इंडियासमोर उभारली मोठी धावसंख्या

दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून डेविड मिलर आणि बेबी एबीनंतर ट्रिस्टन स्टब्सचा धमाका, टीम इंडियाकडून बुमराह चमकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 20:58 IST

Open in App

IND vs SA ICC T20 World Cup 2026 Super 8 Match : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघासमोर १८८ धावांचे टार्गेट सेट केले आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपच्या भेदक माऱ्यातून सावरत डेविड मिलर आणि बेबी एबी अर्थात डेवॉल्ड ब्रेबिस यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला.  अखेरच्या षटकात ट्रिस्टन स्टब्सनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर  दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १८७ धावा केल्या.  

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

याआधी कधीचं जमलं नाही ते करून दाखवण्याची वेळ!टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एवढ्या मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. याआधी २०१४ च्या हंगामात  मीरपूरच्या मैदानात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध १७३ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. २०१६ मध्ये वानखेडे येथे इंग्लंडने केलेल्या २३० धावांनंतर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे.

पॉवर प्लेमध्ये  बुमराह-अर्शदीपचा जलवा 

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने क्विंटन डी कॉक ६ (७), एडेन मार्करम ४(७) आणि रायन रिकल्टन ७ (७) स्वस्तात माघारी फिरले. पॉवर प्लेमध्ये जसप्रीत बुमराहनं २ तर अर्शदीप सिंगनं एक विकेट घेतली. पहिल्या ६ षटकांत ४४ धावांवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. 

संघ अडचणीत असताना मिलर डेवॉल्ड ब्रेविस जो़डी जमली अन्...

बुमराह आणि अर्शदीप सिंगनं सुरुवातीच्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बॅकफूटवर ढकलल्यावर तिसऱ्या विकेटसाठी डेविड मिलर आणि डेवॉल्ड ब्रेविस जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० चेंडूत ९७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. डेवॉल्ड ब्रेविसची विकेट घेत शिवम दुबेनं टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. त्याने २९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४५ धावांचे योगदान दिले. वरुण चक्रवर्तीनं मिलरच्या किलर खेळीला ब्रेक लावला. त्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात ट्रिस्टन स्टब्सनं २४ चेंडूत  १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर १८७ धावा लावल्या.  टीम इंडियाकडून बुमराहनं सर्वाधिक ३ ,अर्शदीप सिंगनं २ तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Miller, Stubbs power South Africa to challenging total against India.

Web Summary : Miller and Stubbs' explosive batting helped South Africa reach 187/7 in Ahmedabad. India faces a record chase at the Narendra Modi Stadium, needing 188 to win.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजसप्रित बुमराह