IND vs SA Eden Gardens Test Record Breaking Jasprit Bumrah : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहनं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. १४ षटकात २३ धावा खर्च करताना जसप्रीत बुमराहनं दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत धाडला. रेड बॉल क्रिकेटमध्ये पहिल्या दिवशी पाच विकेट्स हॉलचा डाव साधणारा तो पहिला भारतीय जलदगती गोलंदाज ठरला आहे. याआधी इशांत शर्मा याने कसोटीत अशी कामगिरी केली होती. पण त्याने डे नाईट क्रिकेट सामन्यात हा डाव साधला होता. इथं एक नजर टाकुयात पाच विकेट्सचा डाव साधत जसप्रीत बुमराहनं आपल्या नावे केलेल्या खास विक्रमांवर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१७ वर्षांनी भारतीय मैदानात पाहायला मिळाली अशी कामगिरी
२००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळात ५ विकेट्सचा डाव साधला होता. त्यानंतर अशी कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह हा दुसरा गोलंदाज आहे. २०१९ मध्ये इशात किशन याने कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात डे नाईट कसोटी सामन्यात अशी कामगिरी नोंदवली होती.
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
कसोटीत भारताकडून सर्वाधिक वेळा पाच विकेट्सचा डाव साधणारा पाचवा गोलंदाज
जसप्रीत बुमराहनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेत भागवत चंद्रशेखर या दिग्गज भारतीय गोलंदाजाची बरोबरी साधली. भागवत चंद्रशेखर यांनी ५८ डावात कसोटीत १६ वेळा ५ विकेट्सचा डाव घेतला होता. जसप्रीत बुमराहनं ५१ व्या सामन्यात १६ व्या वेळी अशी कामगिरी करून दाखवली आहे. या यादीत आर. अश्विन अव्वलस्थानी आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०६ व्या सामन्यात ३७ व्या वेळी पाच विकेट्सचा डाव साधला होता.
भारताकडून सर्वाधिक वेळा पाच विकेट्सचा डाव साधणारे गोलंदाज
- ३७- आर. अश्विन (१०६ व्या सामन्यात)
- ३५- अनिल कुंबळे (१३२ व्या सामन्यात)
- २५ - हरभजन सिंग (१०३ व्या सामन्यात)
- २३ - कपिल देव (१३१ व्या सामन्यात)
- १६- जसप्रीत बुमरा (५१ व्या सामन्यात) / भागवत चंद्रशेखर (५८ व्या व्या सामन्यात)
आर. अश्विनलाही टाकले मागे
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना सर्वाधिक वेळा बोल्ड करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराहनं आर. अश्विनला मागे टाकले आहे. आर. अश्विनने कसोटी कारकिर्दीत १५१ विकेट्स या बोल्डच्या रुपात घेतल्या. बुमराहनं रिकल्टनला बोल्ड करत त्याला मागे टाकले.
वसीम अक्रमचा विक्रमही मोडला
SENA देशांविरुद्ध सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणाऱ्या आशिया गोलंदाजांच्या यादीत बुमराहनं पाकिस्तानच्या वसीम अक्रमचा विक्रम मोडीत काढत अव्वलस्थान पटकावले आहे. वसीम अक्रमनं आपल्या कारकिर्दीत ७५ डावात १२ वेळा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच विकेट्सचा डाव साधला होता. बुराहनं १३ व्या वेळी ही कामगिरी करून दाखवली आहे.