Join us

Ind vs SA: सावधान! भारताला पराभूत करण्याची रणनीती आखतोय रबाडा

गेल्या दौऱ्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्यांनी भारताला पराभूत केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 20:50 IST

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधल्या ट्वेन्टी-20 मालिकेला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने भारताविरुद्ध खास रणनीती आखली आहे.

गेल्या दौऱ्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्यांनी भारताला पराभूत केले होते. पण कसोटी मालिकेत मात्र दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला नव्हता. या गोष्टीचा दाखला रबाडाने दिला आहे.

रबाडा म्हणाला की, " भारतामध्ये खेळण्याचा आम्हाला चांगलाच अनुभव आहे. गेल्या दौऱ्यात आम्ही ट्वेन्टी-20 मालिका जिंकली होती. यावेळीही आम्ही मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहोत. कारण यावेळी आम्ही खास रणनीती आखली आहे. या रणनीतीचा अवलंब झाल्यास आम्ही मालिका जिंकू शकतो."

टॅग्स :टी-२० क्रिकेटभारतद. आफ्रिका