India vs South Africa 5th T20I Live Updates : ०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. पाचवा व अंतिम सामना आज बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे आणि तो जिंकल्यास आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रिषभ हा पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. पण, ऐतिहासिक कामगिरीच्या मार्गात पाऊस खोडा घालण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. निर्णायक सामन्यात आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma) याला चौथ्या सामन्यात दुखापत झाली होती. भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर त्याच्या उजव्या हाताला मार लागला होता आणि त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला होता. त्याची दुखापत अजूनही बरी झाली नसल्याने त्याने पाचव्या सामन्यातून माघार घेतली. केशव महाराज आज दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व सांभाळणार आहे. आफ्रिकेचा कर्णधार बदलला तरीही टीम इंडियाला नाणेफेक जिंकता आलेली नाही. केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
![]()
आफ्रिकेच्या संघात तीन बदल झाले असून कागिसो रबाडा, रिझा हेड्रिक्स व त्रिस्तान स्तुब्ब्स हे आज खेळणार आहेत. भारतीय संघात बदल करण्यात आलेला नाही.