Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण

टॉस होण्याआधी भारतीय संघ उप कर्णधार शुभमन गिलशिवाय मैदानात उतरण्याची माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:50 IST

Open in App

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना लखनौच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी मोठी माहिती समोर येत आहे. टी-२० संघाचा उप कर्णधार शुभमन गिल चौथ्या टी-२० सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला आहे. पायाच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. चौथ्या टी-२० सामन्यासाठी नाणेफेक ही साडे सहा वाजता होणं अपेक्षित होते. पण मैदानात धुके असल्यामुळे आयत्या वेळी टॉसचे टायमिंग बदलण्याची वेळ आली. ६ वाजून ५० मिनिटांनी पंच मैदानाची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच सामना कधी सुरु होणार ते चित्र स्पष्ट होईल.

 

टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशुभमन गिल