Join us

India vs South Africa 3rd Test: पुजाराने झेल सोडला अन् भारताला बसला ५ धावांचा दंड, क्रिकेटचा 'हा' नियम तुम्हाला माहित्ये का? (Video)

गोंधळामुळे पुजाराच्या हातून झेल सुटला, पण गोष्ट तिथेच संपली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 19:39 IST

Open in App

India vs South Africa 3rd Test: टीम इंडियाने पहिल्या डावात २२३ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजांनाही बऱ्यापैकी नाचवलं. पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीपर्यंत ७ गड्यांच्या मोबदल्यात आफ्रिकेला द्विशतकही गाठता आलं नाही. पहिल्या दिवशी भारताचा डाव आटोपल्यानंतर आफ्रिकेनेही कर्णधार एल्गर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होताच आफ्रिकेने पहिल्या सत्रात दोन तर दुसऱ्या सत्रात चार गडी गमावले. पण दुसऱ्या सत्रात पुजाराच्या एका कृतीमुळे आफ्रिकन संघाला फुकट पाच धावांचा लाभ झाला.

आफ्रिकेची धावसंख्या ४ बाद १३८ असताना शार्दूल ठाकूरने टेम्बा बवुमाला गोलंदाजी केली. बवुमाच्या बॅटला लागून चेंडू पहिल्या स्लिपकडे गेला. पण ऋषभ पंतने झेल घेण्यासाठी उडी मारल्यामुळे पुजाराचा थोडासा गोंधळ झाला. या गोंधळामध्ये पुजाराच्या हातून झेल सुटला. पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे आफ्रिकेच्या संघाला फुकटच्या पाच धावा मिळाल्या.

पाहा व्हिडीओ-

असा आहे नियम

पुजाराच्या हातून झेल सुटला असला तरीही गोष्ट तिथेच संपली नाही. चेंडू तेथून सुटल्यानंतर किपरच्या मागे ठेवलेल्या हेल्मेटला जाऊन आदळला. त्यामुळे भारतीय संघाला पाच धावांचा दंड बसला. क्रिकेटच्या नियमानुसार किपरच्या मागे जर हेल्मेट ठेवलेले असेल आणि फलंदाजाच्या बॅटला लागून चेंडू त्या हेल्मेटवर आदळला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच पेनल्टी धावा मिळतात. त्यामुळे क्रिकेटच्या कलम २८च्या नियमानुसार आफ्रिकेला पाच धावा मोफत मिळाल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचेतेश्वर पुजारारिषभ पंतविराट कोहली
Open in App