IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीनं बर्थ डे बॉय राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला, लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला  

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) पुनरागमनामुळे भारतीय संघाचे मनोबल नक्की उंचावले, परंतु त्याचा मैदानावरील कामगिरीत काही उपयोग झालेला पाहायला मिळाला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 04:26 PM2022-01-11T16:26:55+5:302022-01-11T16:27:29+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 3rd Test Live Updates : Virat Kohli becomes the second leading run-scorer by an Indian player in Tests in South Africa, he overtakes Rahul Dravid  | IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीनं बर्थ डे बॉय राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला, लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला  

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीनं बर्थ डे बॉय राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला, लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) पुनरागमनामुळे भारतीय संघाचे मनोबल नक्की उंचावले, परंतु त्याचा मैदानावरील कामगिरीत काही उपयोग झालेला पाहायला मिळाला नाही. हनुमा विहारीवर पुन्हा एकदा अन्याय झाला. मोहम्मद सिराजच्या जागी संघात उमेश यादवनं जागा पटकावण्यात यश मिळवलं. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर विराटनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु मयांक अग्रवाल व लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर पहिल्या सत्रातच माघारी परतले. पण, बाद होण्यापूर्वी दोघांनी मोठा विक्रम केला. चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट यांनी लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला आहे. विराटनं या सामन्यात बर्थ डे बॉय व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचा विक्रम मोडला.

लोकेश व मयांक यांनी मागील दोन सामन्यांत चांगली कामगिरी केली होती आणि त्यामुळे त्यांच्याकडून आजही अपेक्षा उंचावली होती. पण, १२व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज ड्युआने ऑलिव्हर यानं राहुलला बाद केले. ऑलिव्हरनं टाकलेला चेंडू राहुलच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक कायले व्हेरेयनेच्या हाती विसावला. पाठोपाठ मयांकही कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करामच्या हाती झेल देऊन बाद झाला. राहुल व मयांक यांनी अनुक्रमे १२ व १५ धावा केल्या आणि भारताला ३३ धावांवर दोन धक्के बसले. पण, दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत २००+ धावांची भागीदारी करणाऱ्या पहिल्या सलामीवीरांचा मान या जोडीनं पटकावला. 

पुजारा व विराट यांनी चांगला खेळ करताना पहिल्या सत्रात भारताला आणखी धक्के बसू दिले नाही. या दोघांनी लंच ब्रेकपर्यंत ९५ चेंडूंत नाबाद ४२ धावा जोडल्या आहेत. विराटच्या कव्हर ड्राईव्हनं साऱ्यांची वाहवाह मिळवली आहे. दोन वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ विराट या त्याच्या ९९व्या कसोटी सामन्यात संपवेल असा विश्वास त्याची खेळी पाहून वाटत आहे. भारतानं लंच ब्रेकपर्यंत २ बाद ७५ धावा केल्या आहेत.

विराटनं मोडला द्रविडचा विक्रम
दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराटनं ६२४* धावांसह दुसरे स्थान पटकावले आहे. सचिन तेंडुलकर ११६१ धावांसह अव्वल स्थानावर आहे. राहुल द्रविडच्या नावावर ६२४ धावा आहेत. त्यानंतर व्हि व्हि एस लक्ष्मण ( ५६६ ) व सौरव गांगुली ( ५०६ ) यांचा क्रमांक येतो.  

Web Title: IND vs SA, 3rd Test Live Updates : Virat Kohli becomes the second leading run-scorer by an Indian player in Tests in South Africa, he overtakes Rahul Dravid 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.