Join us  

IND vs SA 3rd T20I Live Updates : डाव्यांचा खेळ! Rilee Rossouwचे शतक अन् क्विंटन डी कॉकची आतषबाजी; भारतासमोर तगडे आव्हान  

India vs South Afrida 3rd T20I Live Updates :  क्विंटनने रिली रोसोवूसह ८९ धावा चोपून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. क्विंटनची विकेट गेल्यानंतर रोसोवूने मोर्चा सांभाळला अन् शतक झळकावून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 8:42 PM

Open in App

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : जीवदान मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock) भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना आफ्रिकेकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला.  क्विंटनने रिली रोसोवूसह ८९ धावा चोपून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. क्विंटनची विकेट गेल्यानंतर रोसोवूने मोर्चा सांभाळला अन् शतक झळकावून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. क्विंटन व रोसोवू या डोन डावखुऱ्या फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली. 

१० चेंडूंत ४८ धावा! 'डेंजर' क्विंटन डी कॉकला बाद करून श्रेयस अय्यरने चूक सुधारली, Video

क्विंटन डी कॉकवर शून्यावर बाद करण्याची संधी गमावली अन् दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतीय गोलंदाजांची वाट लावली. त्याने आणि रिले रोसोवू यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १० षटकांत ९६ धावा उभ्या केल्या. भारताविरुद्ध त्याने ट्वेंटी-२०तील चौथे अर्धशतक झळकावताना कॉलिन मुन्रो व निकोलस पूरन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.  कर्णधार टेम्बा बवुमाला ( ३) उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. क्विंटनने ३३ चेंडूंत फिफ्टी पूर्ण करताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २०१७* धावा करून आफ्रिकेकडून अव्वल स्थान पटकावले. क्विंटन ४३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावांवर रन आऊट झाला आणि रोसोवूसह ४७ चेंडूंत ८९ धावांची भागीदारी संपुष्टात आली.   पुढच्याच चेंडूवर त्रिस्तान स्टब्सचा सोपा झेल दिनेश कार्तिकने टाकला. त्याच स्टब्सने पुढे येत उत्तुंग षटकार खेचला अन् चेंडू स्टेडियमच्या दुसऱ्या माळ्यावर जाऊन पडला. त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर षटकार खेचून रोसोवूने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रोसोवू व स्टब्स या जोडीने २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सिराजच्या गोलंदाजीवर स्टब्सचा सीमारेषेवर झेल टिपला, परंतु तो नो बॉल असल्याने भारताला विकेट मिळू शकली नाही. फ्री हिटच्या चेंडूवर रोसोवूचा पाय यष्टींवर आदळला, पण तो नाबाद राहिला. रोसोवने ट्वेंटी-२०त इंग्लंडविरुद्ध केलेल्या ९६ धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती. मात्र, आज त्याने त्यापेक्षा अधिक धावा चोपल्या.

रोसोवूने ट्वेंटी-२० तील त्याचे पहिले शतक ४८ चेंडूत झळकावले. त्यात ७ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. रोसोवू व स्टब्स ( २३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. मागच्या सामन्यातील शतकवीर डेव्हिड मिलरने दुसऱ्याच चेंडूवर उत्तुंग षटकार खेचून चेंडू स्टेडियमबाहेर पाठवला. चहरचा तो चेंडू नो बॉल ठरला. मिलरने फ्री हिटचा चेंडूही षटकार खेचला. पुढच्या चेंडूवर सिराजने झेल टिपला, परंतु त्याचा पाय सीमारेषेला लागल्याने आफ्रिकेला सलग तिसरा षटकार मिळाला. त्या षटकात २४ धावा आल्याने आफ्रिकेच्या ३ बाद २२७ धावा झाल्या. रोसोवू ४८ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने ५ चेंडूंत १९ धावा कुटल्या.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाक्विन्टन डि कॉकदीपक चहर
Open in App