Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hardik Pandya World Record : पांड्याचा मोठा पराक्रम; T20I मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

कशी आहे हार्दिक पांड्याची T20I मधील आतापर्यंतची कामगिरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 22:07 IST

Open in App

IND vs SA 3rd T20I Hardik Pandya World Record : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्याने एक विकेट्स घेत विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. स्टब्सच्या रुपात तिसऱ्या सामन्यात विकेट नावे करताच पांड्याने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत १०० विकेट्स पूर्ण केल्या. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० विकेट्स घेणारा तो तिसरा खेळाडू ठरला. याआधी अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी ही कामगिरी केली होती. पण हार्दिक पांड्याच्या नावे खास विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

असा पराक्रम करणारा पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला पांड्या

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स आणि १५०० धावा करणारा हार्दिक पांड्या हा पहिला जलदगती अष्टपैलू गोलंदाज ठरला आहे. याआधी कुणालाच अशी कामगिरी करता आलेली नाही. आशिया कप स्पर्धेतील फायनल लढतीआधी दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून धमाकेदार कमबॅक केले आहे. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळीसह त्याने गोलंदाजीत कमाल दाखवली होती. आता तिसऱ्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड रचत त्याने टी-२० वर्ल्ड कपसाठी तयार असल्याचा शड्डूच ठोकला आहे.

IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?

कशी आहे हार्दिक पांड्याची T20I मधील आतापर्यंतची कामगिरी?

हार्दिक पांडया हा टी-२० क्रिकेटमधील भारताचा प्रमुख खेळाडू आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत १२३ सामन्यातील ९६ डावात ६ अर्धशताच्या मदतीने १९३९ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत १२३ व्या सामन्यातील १११ व्या डावात त्याने शंभरावी विकेट घेतली. १६ धावांत ४ विकेट्स ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hardik Pandya's World Record: First player to achieve this in T20I

Web Summary : Hardik Pandya sets world record in T20Is, achieving 100 wickets and 1500 runs. He's the first fast-bowling all-rounder to reach this milestone. Pandya's comeback strengthens India's T20 World Cup preparations.
टॅग्स :हार्दिक पांड्यादक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका