पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या क्विंटन डी कॉक याने विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी शतक झळकावले. या सामन्यात ८० चेंडूत त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील २३ व्या शतक झळकावले. प्रसिद्ध कृष्णानं बोल्ड करण्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरानं ८९ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १०६ धावा करताना अनेक विक्रमाला गवसणी घातली. यात त्याने श्रीलंकन दिग्गज कुमार संगकाराला मागे टाकताना सनथ जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरीचा डाव साधला. एवढेच नाही तर अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याचे शतकात रुपांतर करण्याच्या बाबतीत तो किंग कोहलीपेक्षा भारी ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जयसूर्यापेक्षा जलदगतीने साधला ७ शतकांचा डाव
क्विंटन डी कॉकनं सलामीवीराच्या रुपात टीम इंडियाविरुद्ध ७ वे शतक झळकावले. या खेळीसह त्याने श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याची बरोबरी साधली आहे. जयसूर्यानं ८५ डावात भारतीय संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ७ शतके झळकावली होती. क्विंटन डी कॉकनं अवघ्या २३ डावात हा डाव साधला आहे. त्यामुळे बरोबरी केली असली तरी वेगाच्या बाबतीत तो जयसूर्यापेक्षा भारी ठरतो.
भारताविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके झळकावणारे सलामीवीर
- ७ - क्विंटन डी कॉक (२३ डाव)
- ७- सनथ जयसूर्या (८५ डाव)
- ६- एबी डिव्हिलियर्स
- ६ - रिकी पाँटिंग
- ६ - कुमार संगकारा
विकेट किपरच्या रुपात एका संघाविरुद्ध सर्वाधिक ७ शतके झळकावण्याचा विक्रम आता क्विंटन डी कॉकच्या नावे झाला आहे. या यादीत एडम गिलख्रिस्ट दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध ६ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. संगकारानं भारतीय संघाविरुद्ध ६ तर बांगलादेशविरुद्ध ५ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. भारताशिवाय श्रीलंकेविरुद्ध डी कॉकनं ४ शतके ठोकली आहेत.
वनडेत अर्धशतकी खेळीच शतकात रूपांतर करण्याचा दर (Conversion Rate) (किमान १०० डाव खेळलेले फलंदाज)
- ४१.८१ टक्के - क्विंटन डी कॉक
- ४१.४० टक्के - विराट कोहली
- ४०.९१ टक्के - हाशिम अमला
- ४० टक्के -डेविड वॉर्नर
- ३८.७८ टक्के – शाई होप