IND vs SA, 3rd ODI Live Updates : मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर यांच्या प्रत्येकी दोन विकेट्स; Ravi Bishnoiचा अफलातून झेल, आफ्रिकेच्या ६ बाद ७१ धावा, Video 

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळवला जातोय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:46 IST2022-10-11T15:46:23+5:302022-10-11T15:46:46+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 3rd ODI Live Updates : Two wickets for Mohammad Siraj & Washington Sundar now, Ravi Bishnoi keeps calm and takes a juggling catch, South Africa 71/6, Video  | IND vs SA, 3rd ODI Live Updates : मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर यांच्या प्रत्येकी दोन विकेट्स; Ravi Bishnoiचा अफलातून झेल, आफ्रिकेच्या ६ बाद ७१ धावा, Video 

IND vs SA, 3rd ODI Live Updates : मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर यांच्या प्रत्येकी दोन विकेट्स; Ravi Bishnoiचा अफलातून झेल, आफ्रिकेच्या ६ बाद ७१ धावा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळवला जातोय... पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने रांची येथे जबरदस्त कमबॅक केले. इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करताना भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.  २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतात वन डे मालिका जिंकली होती, तर २००५मध्ये चार सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली होती. १९९२, १९९६, २००० आणि २०१०मध्ये त्यांना मालिकेत पराभव पत्करावा लागला होती. 

कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही, परंतु आफ्रिकेने सलग तिसऱ्य़ा सामन्यात कर्णधार बदलला. लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो व मार्को येनसेन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले असून केशव महाराज, वेन पार्नेल व कागिसो रबाडा यांना विश्रांती दिलीय. डेव्हिड मिलर आजच्या सामन्यात आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवित आहे. तिसऱ्याच षटकात आफ्रिकेला धक्का बसला. वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकला ( ६) माघारी पाठवले. 

मोहम्मद सिराज व आवेश खान यांनी आज प्रभावी गोलंदाजी केली. सिराजने आफ्रिकेला दोन मोठे धक्के देताना यानेमन मलान ( १५) व रिझा हेंड्रीक्स ( ९) यांना माघारी पाठवले. बदली खेळाडू म्हणून आलेल्या रवी बिश्नोईने सुरेख झेल टिपला. त्यानंतर शाहबाज अहमदने ( Shahbaz Ahmed)  एडन मार्कराम ( ९) याला यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. त्यानंतर वॉशिंग्टनने सामन्यातील दुसरी विकेट घेताना डेव्हिड मिलरला ( ७) त्रिफळाचीत केले. पुढील षटकात कुलदीप यादवने अँडिले फेहलुकवायोचा ( ५) त्रिफळा उडवला अन् आफ्रिकेची ६ बाद ७१ धावा अशी दयनीय अवस्था झाली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs SA, 3rd ODI Live Updates : Two wickets for Mohammad Siraj & Washington Sundar now, Ravi Bishnoi keeps calm and takes a juggling catch, South Africa 71/6, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.