India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळवला जातोय... पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने रांची येथे जबरदस्त कमबॅक केले. इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करताना भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दिल्लीत मागील ३-४ दिवस संततधार पावसामुळे खेळपट्टी ओली होती आणि त्यामुळे आजचा सामना अर्धा तास उशीराने सुरू करावा लागतोय.
बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार १ वाजता होणारी नाणेफेक आता १.४० वाजता झाली आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतात वन डे मालिका जिंकली होती, तर २००५मध्ये चार सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली होती. १९९२, १९९६, २००० आणि २०१०मध्ये त्यांना मालिकेत पराभव पत्करावा लागला होती. भारतीय संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही, परंतु आफ्रिकेने सलग तिसऱ्य़ा सामन्यात कर्णधार बदलला. लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो व मार्को येनसेन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले असून केशव महाराज, वेन पार्नेल व कागिसो रबाडा यांना विश्रांती दिलीय. डेव्हिड मिलर आजच्या सामन्यात आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवित आहे.
भारतीय संघ - शिखर धवन, शुबमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाद अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"