India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस हा दोन्ही संघांसाठी चढ-उतारांचा राहिला. पहिल्या सत्रातील पहिल्या ११ चेंडूंवर भारताचे दोन अनुभवी फलंदाज माघारी पाठवून आफ्रिकेनं सामना मुठीत घेतला. पण, नंतर रिषभ पंत व विराट कोहली ( Rishabh Pant - Virat Kohli) यांनी ती पकड सैल करताना भारताला फ्रँटसीटवर आणून बसवले. इथेच रोमांच थांबला नाही. लुंगी एनगिडीनं विराटची विकेट घेतली अन् भारताचा डाव पुन्हा गडगडला... रिषभ पंत अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. संघाच्या १५२ धावा असताना विराट बाद झाला अन् अवघ्या ४६ धावांत सहा फलंदाज माघारी फिरले. रिषभच्या शतकामुळे टीम इंडियाला आफ्रिकेसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभं करता आलं.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत १०० धावांवर नाबाद राहिला; भारताचे तळाचे ६ फलंदाज ४६ धावांत परतले, पण हा एकटा नडला
IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत १०० धावांवर नाबाद राहिला; भारताचे तळाचे ६ फलंदाज ४६ धावांत परतले, पण हा एकटा नडला
India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस हा दोन्ही संघांसाठी चढ-उतारांचा राहिला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 19:03 IST